Header Ads

Header ADS

रेल्वेत ११,२०० हून अधिक TC पदांसाठी नोकरी उपलब्ध, पगार जाणून घ्या


 रेल्वेत ११,२०० हून अधिक TC पदांसाठी नोकरी उपलब्ध, पगार जाणून घ्या


लेवाजगत न्युज मुंबई:- रेल्वे भरती मंडळाने रेल्वे तिकीट तपासणीस पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीअंतर्गत अर्ज करण्याची इच्छा आहे आणि ते यासाठी अर्ज प्रक्रियेतील अटींनुसार पात्र ठरत असणाऱ्या उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ देऊन भरतीची जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.





ही भरती इंडियन रेल्वेतील टिसी पदासाठी असून, त्यांच्या अंतर्गत एकूण तब्बल ११२५५ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. भरती प्रक्रियेतून निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २५,००० ते ३४,४०० रुपये पगार मिळणे अपेक्षित आहे. रिक्त पदांच्या नेमक्या संख्येची अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर केली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे जुलै २०२४ पर्यंत रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे रिक्त पदांची अधिकृत घोषणा केली जाईल.


भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ पात्रता निकष-Indian Railway TC Recruitment 2024:रेल्वे भरती मंडळाद्वारे TC भरतीसाठी पात्रता निकष अद्याप बाहेर आलेले नाहीत परंतु लवकरच याबद्दल परिपत्रक जाहीर करण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे वयोगटातील असणे अपेक्षित आहे. 

OBC, SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३ ते ५ वर्षाची सूट आणि राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

याशिवाय, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राज्यात विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतील १०वी आणि १२वी इयत्तेची परीक्षा किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त केंद्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे अपेक्षित आहे.


भारतीय रेल्वे भरती निवड प्रक्रिया-Indian Railway TC Recruitment 2024 Selection Process:

संगणक आधारित चाचणी (CBT)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (फक्त CBT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी)

वैद्यकीय तपासणी.

मुलाखत (Walk-in Interview)


भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ साठी अर्ज कसा करावा?-RRB TC Steps to Apply :

भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरल्यानंतर भरती सुरू होईल.

भारतीय रेल्वे बोर्ड भर्तीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

तेथे तुम्हाला एक भरती विभाग मिळेल ज्या अंतर्गत तुमच्याकडे RRB TC 2024 लिंक असेल.

जेव्हा तुम्ही टॅबवर क्लिक कराल तेव्हा ते तुमच्याकडे एक पृष्ठ पुनर्निर्देशित करेल जिथे अर्ज उपलब्ध असेल.

अर्ज पूर्ण आणि अचूक भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करा.

ऑनलाइन अर्ज फी भरा. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्ह्णून ५०० रुपये तर SC आणि ST उमेदवारांसाठी शुल्क २५० रुपये भरणे अनिवार्य असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.