Header Ads

Header ADS

जळगावात पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


 जळगावात पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


लेवाजगत न्युज जळगाव :- जळगाव शहरातील काशिनाथ चौकात महिंद्रा पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.



याबाबत अधिक असे की, निलेश दिलीप ताकुळदे वय २८ रा कुसुंबा ता.जि. जळगाव हा तरूण दुचाकी (क्रमांक एमएच १९ बीझेड ८११०) ने सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगावकडून कुसुंबा येथे जाण्यासाठी निघाला असतांना काशिनाथ चौकात भरधा वेगाने येणारी महिंद्रा पिकअप वाहन (क्रमांक एमएच ४१ जी ७६५५) ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश ताकुळदे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर निलेशने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.