Header Ads

Header ADS

नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत पतंजलि योग समितीच्या महिला व पुरुष योग शिक्षकांचा हृद्य सत्कार समारंभ

Patanjali-Yoga-Committee's-Female-and-Male-Yoga-Teachers-Feeling-Ceremony-Through-Narendra-Pawar-Foundation


नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत पतंजलि योग समितीच्या महिला व पुरुष योग शिक्षकांचा हृद्य सत्कार समारंभ

कल्याण : (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी ) यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन ( २१ जून २०२४ ते १४जून) कल्याण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सुमारे ३०० जागांवर हजारो साधकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.योगा बाबत जनजागृती निर्माण करण्याचे कार्य पतंजली योग समिती च्या योगशिक्षक,शिक्षिका यांनी या माध्यमातून केले. हा महोत्सव साजराकरण्यासाठी कल्याण पश्चिम येथील नरेंद्र पवार फाउंडेशनचे प्रमुख मा. आमदार आदरणीय नरेंद्रजी पवार यांनी देखील धडाडीने सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा केल्याबद्दल नरेंद्र पवार फाउंडेशन च्या वतीने सर्व योगशिक्षक पदाधिकारी बंधू भगिनी यांचा सत्कार समारंभ सहकार मंदिर आग्रा रोड येथे संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमास श्री नरेंद्र पवार,त्यांचे सर्वकार्यकर्ते पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी योग शिक्षक बंधू भगिनी व कल्याण शहर, टिटवाळा परिसरातील अनेक साधक वर्ग,कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. 





     योग महोत्सवात विशेष सहभाग नोंदवल्याबद्दल समाजसेवक व योगप्रेमी  सुनिल इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री नरेंद्रजी पवार यांनी सर्व योगशिक्षक बंधू भगिनीं च्या कार्याचे कौतुक करून सलगपणे नि:शुल्क योग वर्ग घेण्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. नवीन ठिकाणी योग शिक्षकांना योग वर्ग घेण्यासाठी नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत नि:शुल्क हाॅल उपलब्ध करून देण्याबाबत आश्वस्त केले.

श्री परमेश्वरजी जाधव (जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट)यांनी समितीच्या कार्याबाबत माहिती दिली. बंधू भगिनींनी एकत्रित कार्य करण्याचे महत्त्व विशद केले. 

सतीश मुळावेकर (जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती) यांनी योग कार्याचा प्रचार व प्रसार करण्याबाबत,योग म्हणजे एकमेकांमध्ये वैचारिक गुंफण करणे व एकत्रितपणे कार्य करणे बाबत मार्गदर्शन केले. 

मीनाताई रावत (वरिष्ठ मार्गदर्शिका)यांनी कडक शब्दांमध्ये कार्याचे महत्त्व सांगितले. समितीचे कार्य बीजापासून वृक्षापर्यंत कसे झाले, याबाबत विवेचन केले. 

वंदनाताई कल्याणकर (जिल्हा प्रभारी महिला पतंजली योग समिती) यांचा अपघात झालेला असून तशा परिस्थितीत देखील सामाजिक कार्यास प्राधान्य देऊन उपस्थिती दर्शविली व महिलांना प्रोत्साहन पर विशेष असे मार्गदर्शन केले. 

श्री अनिल पवार (पतंजली कृषी समिती जिल्हा प्रभारी)यांनी सध्या प.पू. रामदेवजी महाराज यांच्यावर आय एम ए यांनी केलेल्या आरोपाबाबत सकारात्मक बाजू विशद केली. श्री विठ्ठल सिंग राजपूत ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी योगाचे अध्यात्मिक स्वरूप व त्याबाबतची सखोल माहिती सर्व साधकांना दिली.श्री प्रमोद शिंदे योगशिक्षक यांनी कठीण योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून नियमित योग साधनेमुळे कसे शक्य झाले, हे दाखवून दिले व त्याबाबतचे नियमित सराव घेण्याबाबतचे निश्चित केले.यावेळी प्रमोद शिंदे यांचा प्रमाणपत्र सहित सत्कार करण्यात आला.अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.