Header Ads

Header ADS

अन्यथा पालकांना जावे लागेल तुरुंगात-सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे रस्ता सुरक्षा बाबद मार्गदर्शन

 

Otherwise-parents-will-have-to-go-to-jail Assistant-Inspector-of-Police-Vishal-Patil-Guidelines-Regarding-Road-Safety


अन्यथा पालकांना जावे लागेल तुरुंगात-सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे रस्ता सुरक्षा बाबद मार्गदर्शन 

लेवाजगत न्यूज चिनावल तालुका रावेर-येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडील रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह बाबत तसेच डायल ११२. घरफोडी प्रतिबंध संदर्भात तसेच नवीन कायदे संदर्भात मार्गदर्शन व युवक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सावदा पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील  यांचा संस्थाध्यक्ष सुनील महाजन,चेअरमन विनायक महाजन,शालेय समिती सदस्य अनिल किरंगे,प्राचार्य एच.आर.ठाकरे,उपप्राचार्य सौ.मिनल नेमाडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.





   या प्रबोधन कार्यक्रमांमध्ये एपीआय विशाल पाटील यांनी उपस्थित युवक युवतींना वाहतूक नियम,रस्ते सुरक्षा याबाबतीत मार्गदर्शन केले.कानाला हेडफोन लावून गाडी चालवणे,गाडी चालवतांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे,१८ वर्षाखालील व्यक्तींनी वाहन चालवले तर होणारी कडक कारवाई तसेच सायबर गुन्ह्यांबाबत, वाढत्या वयातील आकर्षण याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी एपीआय विशाल पाटील यांनी उपस्थित युवक युवतींना रस्ते सुरक्षा वाहतूक नियम याविषयी प्रतिज्ञा दिली. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे विनोद पाटील,निलेश बावस्कर संस्थाध्यक्ष सुनील महाजन,चेअरमन विनायक,महाजन,प्राचार्य.एच.आर.ठाकरे, उपप्राचार्य मीनल नेमाडे यांच्यासह असंख्य युवक युवती उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस.महाजन यांनी केले तर आभार एच.आर.ठाकरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एस.नेहेते,आर.ए. होले, वाय.एस.बोरोले,जे.जे.तडवी,लिनय बोंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.