Header Ads

Header ADS

बेपत्ता महिला डॉक्टरची साई टेकडी डोंगरात आत्महत्या १७ जुलै रोजी मंदिरात गेल्या होत्या दर्शनासाठी

 बेपत्ता महिला डॉक्टरची साई टेकडी डोंगरात आत्महत्या १७ जुलै रोजी मंदिरात गेल्या होत्या दर्शनासाठी

लेवाजगत न्यूज  छत्रपती संभाजीनगर:-आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी जाते, असे सांगून घरातून गेलेल्या डॉ. रूपाली नितीन बोरसे (५०, रा. प्रथमेशनगर, देवळाई चौक) यांचा मृतदेह साई टेकडी परिसरातील डोंगरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत २१ जुलै रोजी संध्याकाळी आढळला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज चिकलठाणा पोलिसांनी व्यक्त केला.

Missing-woman-doctor's-sai- hill-suicide-on-July-17-went-to-temple-for-darshan





     रूपाली आणि त्यांचे पती नितीन डॉक्टर आहेत. त्यांना एक मुलगा असून तो नोकरी करतो. १७ जुलैला रूपाली विठ्ठलाच्या मंदिरात जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या.त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही. नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. अखेर पतीने सातारा ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याचा तपास सुरू असताना २१ जुलैला संध्याकाळी गुरे चारणाऱ्यास साई टेकडी डोंगरावरील झाडाला महिलेचा मृतदेह दिसला. ही माहिती सहायक उपनिरीक्षक जगदाळे यांना मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून घाटीत दाखल केला.

   पंधरा वर्षांपूर्वी केला होता आत्महत्येचा प्रयत्न डॉ. रूपाली यांनी पंधरा वर्षांपूर्वी पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे हिटर हातात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांची दोन बोटे भाजून निकामी झाली होती. त्यावरूनच त्यांच्या पतींनी मृतदेहाची ओळख पटवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.