Header Ads

Header ADS

खिर्डी निंभोरा रस्त्यांच्या खड्ड्या मुळे अपघातात वाढ 'सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष'

 

खिर्डी निंभोरा रस्त्यांच्या खड्ड्या मुळे अपघातात वाढ 'सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष'


लेवाजगत न्युज रावेर:- रावेर ताुक्यातील खिर्डी ते निंभोरा रस्त्यावरील असलेले खड्डे दिवसांदिवस अपघाताला निमंत्रण देत असून या रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे सदरहून रोडवर खड्ड्यांमुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 


अनेक वेळा मोटरसायकल धारकांचे अश्या खड्डे चुकवीतांना अपघात झाले आहेत. दि ५ रोजी खिर्डी येथील इस्माचे खिर्डी ते निंभोरा दरम्यान उड्डाण पुलाच्या आधी असलेल्या खड्ड्यांमुळे गाडीचा टायर सरकल्याने अपघात झाले सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही,मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे,तसेच निंभोरा खिर्डी दरम्यान असलेल्या खिर्डी ते निंभोरा जातांना उड्डाण पुलाच्या सुरुवातीला उड्डाण पुलाच्या ठेकेदाराने रोडवरील एक खटका किंवा गतिरोधक सारखे जॉइंट ठेवले आहे.



 ज्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे,तसेच अनेक वाहनधारकांची वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे,तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील रस्त्याचे खड्डे बुजवावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.