Header Ads

Header ADS

सावदा रेल्वे स्टेशन येथे कारगिल विजय दिवस साजरा

Kargil-Victory-Day- celebrated at Savada-Railway-Station


 सावदा रेल्वे स्टेशन येथे कारगिल विजय दिवस साजरा

 लेवाजगत न्यूज सावदा:- यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा जळगावच्या पुढाकाराने 25 वा कारगिल विजय दिवस सावदा रेल्वे स्टेशन येथे साजरा करण्यात आला, अध्यक्ष स्थानी 1971 चे युध्दविर सुभेदार मेजर ( रिटायर्ड) सुरेश तेलांग  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर नगरचे आमदार सन्माननीय चंद्रकांत पाटील, सावदा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सपोनि विशाल पाटील होते. सर्व प्रथम शहीद सैनिक  स्मारकास रिथलिंग परेड च्या माध्यमातून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी व सैनिकांनी सैनिकी शिस्तबद्ध पद्धतीत मानवंदना देण्यात आली.





    कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन माजी सैनिक अशोक दामोदर  यांनी केले. प्रस्ताविक यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे महा सचिव कैलास खिल्लारे यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी कारगिल युद्ध हे 3 मे 1999 ला सुरुवात होउन 26 मे ऑपरेशन विजय पैदल सेना, ऑपरेशन सफेद चादर वायु सेना व ऑपरेशन तलवार नौदल सेना यांचे  संयुक्तरित्या राबवुन 26 जुलैला विजय मिळवून दिला. कारगिल युद्ध हे पाकिस्तानी सैनिकांमार्फत भारतीय LOC मधील 140 युद्ध बंकर मधे नापाक घुसपैठ केली. 4000 - 5000 फुट उंच पहाडीपर मायनस डिग्री सेटिंग्रेड तापमानात आपल्या जिवाची पर्वा न करता  चढुन जाउन निकाराचा लढा भारतीय सैनिकांनी दिला व कारगिल क्षेत्रात घुसलेल्या पाकिस्तान सैनिक व अंतकवाद्यांना खतम करुन 140 युद्ध बंकर वर ताबा मिळवून ऑपरेशन विजय येशस्वी केले. कैलास खिल्लारे यांनी त्यांच्या भाषणातून कारगिल युद्धाचा मास्टर माईंड परवेज मुशर्रफ होता, त्याने कारगिल युद्धाचा प्लान कसा आखला व त्याला येशस्वी करण्याचा कसा प्रयत्न केला तसेच भारतीय सैनिकांनी कसा निकाराचा लढा दिला हे सविस्तर माहीती दिली. 

         कारगिल विजय दिवस कार्यक्रमात विर नारी,विर माता पिता व शहीद परिवाराचा सत्कार करण्यात आला. मुक्ताईनगर मतदार संघाचे  आमदार चंद्रकांत पाटील व सपोनि विशाल पाटील यांनी कारगिल विजय दिवसानिमीत्त आपले विचार व्यक्त केले,सदर कार्यक्रमास,यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे खालील पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते , महासचिव कैलास खिल्लारे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुभेदार भारत तायडे, नाशिक उपाध्यक्ष संजय बाविस्कर, नवल धुरंधर, सुधाकर तायडे, प्रभाकर तायडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजु वानखेडे,प्रकाश मिसाळकर, सुभेदार अशोक पवार, सुभेदार क्रिष्णा खराटे,शेषराव म्हस्के,अशोक दामोदर, हिलोडे, जगन्नाथ कळसकर, भिमराव कळसकर, माजी पोलीस विलास झांबरे, रामु मेढे, राहुल तायडे, सावदा रेल्वे स्टेशन मास्तर तिवारी, संरपंच मॅडम सारीका पाटील, माजी सरपंच, पोलीस कर्मचारी तसेच यश सिध्दी बहुउद्देशीय महीला मंडळ व बरेच नागरीक उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय बाविस्कर साहेबांनी केले, 

         हा कार्यक्रम येशस्वी करण्यासाठी सुभेदार भारत तायडे  ,संजय बाविस्कर स व सर्व जळगाव टिमने अथक प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.