Header Ads

Header ADS

जळगावातील बालकाचा नाल्यांत तोल गेल्याने मृत्यू २४ तासानंतर मृतदेह हाती


 जळगावातील बालकाचा नाल्यांत तोल गेल्याने मृत्यू २४ तासानंतर मृतदेह हाती


लेवाजगत न्युज जळगाव : जळगावातील बालक चेंडू घेण्याच्या नादात


नाल्यात वाहून गेला होता. ही घटना शनिवार, 6 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली होती. या मुलाचा मृतदेह रविवार, 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ आढळला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. मृतदेह पाहता नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सचिन राहुल पवार (सहा, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.


तोल जावून पडताच बालक वाहिला


जळगावात शनिवारी दुपारी एक ते पाच या वेळेत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. खंडेराव नगरातील नाल्याजवळ काही मुले खेळत असताना त्यात सचिन राहुल पवार  हा बालक चेंडू घेण्यासाठी गेल्यानंतर नाल्यात वाहून गेला होता. यावेळी पोलिसांनी शोध मोहीम स्थानिक व मनपाच्या तरुणांच्या मदतीने सुरू केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत यश न मिळाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले.


दुसऱ्या दिवशी मृतदेह हाती


रविवार, 7 जुलै रोजी सकाळी पुन्हा नाल्याच्या परिसरात शोध कार्य सुरू करण्यात आले. यासाठी अग्निशमन दल, स्थानिक तरुण यांची मदत घेण्यात आली. सकाळी 10 वाजेच्या सुमारास चिमुकला बालक सचिन पवार याचा मृतदेह हवालदार जितेंद्र राजपूत, उमेश पवार यांच्या पथकाला आढळून आला.


 पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.