Header Ads

Header ADS

जळगावच्या तरूणाला मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड जवळ मारून पुर्णा नदीत फेकले !

 

जळगावच्या तरूणाला मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड जवळ मारून पुर्णा नदीत फेकले !

जळगावच्या तरूणाला मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड जवळ मारून पुर्णा नदीत फेकले !

लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-जळगावातील तरूणाला मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड जवळच्या जंगलात मारून पुर्णा नदीपात्रात फेकून देण्याची भयंकर घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.





 मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे  निरिक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबतची माहिती दिली. यानुसार, जळगाव येथील नितीन साहेबराव पाटील (वय २४ वर्षे ) या तरूणाला काही जणांनी काल पैशांच्या वादातून मुक्ताईनगर येथे नेले होते. मात्र त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्या सोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले.

   दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्‍या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहमाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे. तर आज सकाळपासून पुर्णा नदीच्या पात्रात संबंधीत तरूणाचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.