Header Ads

Header ADS

बाळासाहेब असते तर पक्षीय फोडाफोडीच राजकारण झालं नसतं - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

If Balasaheb-was-partial-politics-would-not-have-happened-Former-Chief-Minister-Prithviraj-Chavan


बाळासाहेब असते तर पक्षीय फोडाफोडीच राजकारण झालं नसतं - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 

 लेवाजगत न्यूज खिरोदा -तालुका रावेर येथे रविवारी दुपारी माजी विधानसभा अध्यक्ष कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञता सोहळा चे आयोजन करण्यात आले होते. 



JTM

ITI bamnod


    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार सतेज पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ. सुधीर तांबे  माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार दिलीप सोनवणे, प्रदीप पवार, विष्णू भंगाळे, विनोद पाटील उदय पाटील, प्रतिभा शिंदे, सुलोचना चव्हाण  व मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक धनंजय चौधरी यांनी केले.

      कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी असते तर पक्षीय फोडाफोडीच  राजकारण झालं नसतं.  राजकीय घडामोडी घडल्या नसत्या. बाळासाहेबांचा वचक होता. गांधीवादी विचारसरणीचे बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या स्मृति जिवंत ठेवण्याचं कार्य या परिवाराने सातत्याने सुरू ठेवलेला आहे. त्यांनी शिक्षणाचं मोठं कार्य केलं. या परिसरामध्ये संस्था,कारखाने,धरणे,विद्यापीठ, दूध फेडरेशन सुरू करून परिसराला दिशा देण्याचे कार्य केल. कोरोना काळात केलेलं कार्य याची जाण ठेवून कृतज्ञता सोहळा  आयोजित करून सन्मानित केलं. याचा सार्थ अभिमान आहे. असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 

     कोरोना काळामध्ये लाखो लोकांचे जीव वाचवण्याचं कार्य उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळातील सहकारी सत्कार्य यांनी केले. त्यांनी केलेले कार्य न विसरता समाजाची सेवा झोकून दिली. हा सामाजिक संस्कार चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे चांगल्या कामाचा जल्लोष करावा व असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी म्हटले. 

 ऐतिहासिक वारसा लाभलेला हा परिसर आहे.कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी ग्रामीण भागात चांगली काम केली. स्वच्छ जीवन जगले. अलीकडच्या काळात त्यांचा राजकारणातला आदर्श आहे. चांगलं काम चरित्र नैतिकता जोपासली राजकीय शक्ती समाज हितासाठी वापरली  आदिवासींसाठी काम केलं लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. तेव्हाच लोकांचे प्रश्न समजतात. गरिबाच्या खिशाला  आजारी असताना कात्री लागता कामा नये. चांगलं करण्याचे उद्दिष्ट असेल तर देऊ पण आशीर्वाद देतो. आमदार राजेश टोपे. 

 लोहारा येथे कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी पुतळा अनावरण करण्यात आला.

    कोरोना काळात केलेल्या कामाचा कृतज्ञता सोहळा सन्मान करणे ही कल्पना अजून पर्यंत कोणालाही सुचलेली नाही. परंपरा वारसा संस्कार असलेल्या परिवाराने सोळा बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करून सर्वांना चांगला संदेश दिला. बाळासाहेब मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री म्हणून केलेलं काम याची इतिहासात नोंद होईल. खानदेश भाग विचारांनी शिक्षणाने समृद्ध आहे. बाळासाहेबांचा धाक होता ताकद होती. आमदार बाळासाहेब थोरात 


  कोरोना काळात केलेलं कार्य विसरले नाही. कमी व्यक्ती असतात जे केलेल्या कार्याचे जाणीव ठेवून सत्कार करतात.  संस्कार, विचारांचा, रक्ताच्या पिढीचा  वारसा  धनंजय पुढे नेणार. आमदार सतेज पाटील 


 सूत्रसंचालन प्रा. डॉ. जगदीश पाटील, सुरेश पाटील खानापूर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.