Header Ads

Header ADS

ऐकावे ते नवलच जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची हत्या

 

Hear-the-murder-suspect-in-Jalgaon-district-jail-murder-suspect-accused

ऐकावे ते नवलच जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची हत्या

लेवाजगत न्यूज जळगांव-ऐकावे ते नवलच जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची हत्या.याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथिल माजी नगरसेवक हत्याकांडातील संशयित आरोपी सध्या जळगाव जिल्हा कारागृहात आहेत.यांच्यात अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.भुसावळ येथील माजी नगरसेवक तथा रिपाईचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रविंद बाबुराव खरात वय ५५ वर्षे यांची क्रुर हत्या करण्यात आली होती एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या हल्ल्यात रविंद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने भुसावळ शहरासह जिल्हा हादरला होता.पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते या हत्याकांड मध्ये संशयित आरोपींना अटक करण्यात आली असुन ते सध्या जळगाव जिल्हा कारागृहात आहेत. या प्रकरणातील एक संशयित आरोपी मोहसीन असगर खान वय ३४ वर्षे यांच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले मोहसिनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यास मृत घोषित केले. 

     

      कारागृहात बंदी असलेला कैद्याचा थेट खून झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.पोलिसांनी कारागृहाकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.