Header Ads

Header ADS

भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना...चला पंढरपूर...


 भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना


लेवाजगत न्यूज भुसावळ-जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांच्याकडे सदर गाडीची शिफारस केली होती. त्यानुसार भुसावळ रेल्वे स्टेशन येथून दि.16 रोजी दु.01.30 वा पंढरपूरसाठी निघणाऱ्या गाडीस आज रावेर_लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह हिरवा झेंडा दाखवून रवाना केली.





सदर "विशेष आषाढी रेल्वे" गाडी उद्या दि.17 रोजी सकाळी 3.30 वा. पंढरपूर येथे पोहोचणार तर उद्याच रात्री 10.30 वा  येथून परतीला निघणार असुन, दि.18 रोजी भुसावळ येथे परत येणार आहे. 


सदर अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे माझ्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, सदर सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत आहे, यावेळी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.