Header Ads

Header ADS

पत्नीला फोनवरून तलाक पतीवर शहर पोलिसांत गुन्हा

 

Divorce-to-wife-over-phone-Crime-on-husband-in-city-police

पत्नीला फोनवरून तलाक पतीवर शहर पोलिसांत गुन्हा

वृत्तसंस्था जळगाव-वर्षभरापासून पत्नीला माहेरी पाठवून तिला फोनवरून तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ट्रिपल तलाक विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आसिफ दगा पटेल (रा. वाक वडजी) याने जळगावच्या शिवाजीनगरातील माहेर असलेल्या शिरीन पटेल यांना वर्षभरापासून माहेरी पाठवून दिले होते. त्याने मोबाइलवर 'तलाक' दिला. ट्रिपल तलाक प्रकरणी पत्नी शिरीन आसिफ पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





     शिरीन पटेल यांचे वाक वडजी येथील आसिफ पटेल याच्याशी २०२१मध्ये लग्न झाले. त्यानंतर सासरची मंडळी विवाहितेला त्रास देत होती. तसेच वर्षभरापासून तिला माहेरी पाठवून दिले. १८ जुलै २०२४ रोजी या विवाहितेला पतीने मोबाइलवर संपर्क साधून 'मै तुझे तलाक देता हूँ' असे तीन वेळा म्हणत नाते संपल्याचे सांगून मोबाइलवर बोलणे कट केले. या विषयी त्याने विवाहितेच्या काका, आत्या व इतर नातेवाइकांनाही कळवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.