Header Ads

Header ADS

सावदा येथे डाक चौपालच्या माध्यमातून पोस्टाच्या विविध योजनांचा कॅम्प मध्ये नागरिकांनी घेतला लाभ

 



सावदा येथे डाक चौपालच्या माध्यमातून पोस्टाच्या विविध योजनांचा कॅम्प मध्ये नागरिकांनी घेतला लाभ

लेवा जगत न्यूज सावदा- येथील नगरपरिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज गुरुवार रोजी सकाळी भुसावल विभागाच्या वतीने पोस्टाच्या विविध योजनांची माहिती डाक चौपालच्या माध्यमातून कॅम्पद्वारे करण्यात आली. या कॅम्पमध्ये आधार कार्ड अपडेट व पोस्टाच्या विविध योजनांची माहिती, सेविंग खाते ,आरडी खाते नागरिकांनी उघडले.





यावेळी डिव्हिजनचे अधीक्षक मनीष नवलू,ऐ.एस गौरीया,डी.डी. चौधरी ,बी.ए.शेंदाने,मिलिंद बराटे,हेमंत कुरकुरे हे पोस्ट विभागाचे अधिकारी यांचेसह सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रेखा वानखेडे, बाजार समितीचे संचालक सय्यद अजगर,सिमरन वानखेडे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. पोस्टाच्या विविध योजनांची यावेळी अधिकाऱ्यांसह प्रमुख पाहुण्यांनी माहिती दिली.यावेळी उपस्थित महिला व पुरुषांनी आधार मध्ये दुरुस्ती केली. काहींनी विमा घेतला तर सेविंग खाते रिकरिंग, खाते फिक्स डिपॉझिट खाते यामध्ये भरणा केला अशा  ३०० नागरिकांनी यात सहभागी होऊन या डाक चौपालचा लाभ घेतला .महिलांची व पुरुषांची आपली धावपळ यामुळे वाचली एका छताखाली या सोयी उपलब्ध झाल्यामुळे नागरिक समाधानी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.