Header Ads

Header ADS

नशिराबाद गावाजवळ कार-दुचाकीचा भीषण अपघात: दोन जण गंभीर जखमी

 

Car-bicycle-accident near Nashirabad-village-two-people-seriously-injured

नशिराबाद गावाजवळ कार-दुचाकीचा भीषण अपघात: दोन जण गंभीर जखमी  

लेवाजगत न्यूज जळगाव-तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ विरुद्धदिशेने जाणारी दुचाकी व भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या कारची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी १९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक एवढी जोरात होती की, अपघातानंतर कारच्या एअरबॅग उघडल्या होत्या.




   या संदर्भात मिळालेली माहिती अशी, हिरालाल मेहता (वय -३०) व नारायण बामणे (वय -४५), दोन्ही रा. नशिराबाद हे दोन जण दुचाकी क्रमांक (एमपी १० एमझेड २४१८) ने हे दोन जण विरुद्ध दिशेने जळगाव लकडून भुसावळकडे जात होते, त्यावेळी भुसावळकडून जळगाव जळगावकडे जाणारी कार क्रमांक (एमएच १९, ईए ८५०२) येत असताना नशिराबाद गावाजवळील महामार्गावर   दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले आहे. अपघातानंतर नशिराबाद पोलिस घटनास्थळी पोहोचले व अपघातग्रस्त वाहने नशिराबाद पोलिस ठाण्यात नेण्यात आली. कारमध्ये जळगावातील पती, पत्नी व मुलगा असे तिघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी नारायण बामणे यांना गंभीर दुखापत झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.