Header Ads

Header ADS

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मोफत फॉर्म भरण्याचा कॅम्प खाजा नगर येथे यशस्वी-समाजिक कार्यकर्ते सोहेल खान यांचा उपक्रमआ चंद्रकांत पाटील यांनी केले कौतुक

 

CM-my-loved-sister-scheme-free-form-filling-camp-in-Khaja-nagar-successful-social-activist-Sohail-Khan’s-initiative

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मोफत फॉर्म भरण्याचा कॅम्प खाजा नगर येथे यशस्वी-समाजिक कार्यकर्ते सोहेल खान यांचा उपक्रम आ चंद्रकांत पाटील यांनी केले कौतुक





लेवाजगत न्यूज सावदा -येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या उदघाटन दिनांक १७ ला खाजा नगर येथे नगरपालिका होल जवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या  मोफत फॉर्म भरण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला हा कार्यक्रम दि १७-०७-२०२४ पासून ते २१-०७-२०४पर्यंत हा  राबविण्यात आला.

      हा कार्यक्रम समाज सेवक संयोजक सोहेल खान सर,सूरज परदेशी,मोईन खान,फरिद पत्रकार,युसूफ पत्रकार,निसार अहमद,साजिद पत्रकार,शेख कलीम जनाब,शेख कमरु, मोईन लाला,ताबिश खान.समीर शाह.आवेश. रमजान मोमीन,साबिर तडवी,हुसेन बोहरी,व अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य देऊन कार्यक्रमाला यशस्वी करण्यास सहकार्य दिले.आमदार चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत ७६ फार्म भरण्यात आले होते.तरी आजपर्यंत दिनांक २१ रविवार पर्यंत १३० फार्म भरून गोर गरिबांच्या आर्थिक लुट होण्या पासून वाचवले.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे आशीर्वादाने गरिबांना एक प्रकारे  मदतच ठरली आहे. ह्या कार्यक्रमाला अनेक समाजाच्या  गोरगरीब महिलांनी उपस्थिती दिली.तडवी समाज,मुस्लिम समाज,शाह बिरादरी,पिजारी समाज,मोमीन समाज,ज्या'ना माहिती मिळाल्या प्रमाणे सर्व समाजाच्या महिलानी आपले आधार कार्ड,रेशन कार्ड,बॅंक पास बुका'ची झेरॉक्स,देऊन फार्म भरणारया'ना मदत केली. ह्या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील  अध्यक्षतेखाली यशस्वी करण्यात आला व अनेक गोरगरीब महिला'नी मुक्ताईनगरचे लाडका आमदार उच्चारुन उपाधी देऊन त्या'ना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

Blogger द्वारे प्रायोजित.