Header Ads

Header ADS

भालोद ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रतिभा कुंभार यांची निवड

 

Bhalod-Gram Panchayat- Upsarpanchapadi- Pratibha- Selection of Potters


भालोद ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रतिभा कुंभार यांची निवड 

लेवाजगत न्यूज भालोद -तालुका यावल येथील ग्रामपंचायत मध्ये भाजपा प्रणित ग्रामविकास पॅनल ची एक हाती सत्ता आली आहेत. त्यामध्ये ठरल्याप्रमाणे उपसरपंच पद एक वर्ष देण्यात येते विद्यमान उपसरपंच लीना नेहेते यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला त्यांच्या जागी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व सरपंच प्रदीप कोळी यांच्या संमतीने भालोद गावातील कुंभार समाजातील महिला प्रतिभा कुंभार यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच भालोद परिसरात कुंभार समाजातील महिलेला ग्रामपंचायत मध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले.




भालोद तेथे नुकतेच ग्रामपंचायतची मासिक सभा सरपंच प्रदीप श्रीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यामध्ये उपसरपंच म्हणून प्रतिभा कुंभार यांची निवड करण्यात आली या निवळीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गणेश नेहेते, नारायण चौधरी आदींनी अभिनंदन केले याप्रसंगी सरपंच प्रदीप कोळी ग्रामविकास अधिकारी बी.के. पारधी ग्रामपंचायत सदस्य लीना नेहेते, जाबीर खान, सचिन भालेराव, मनोज जावळे, अमोल महाजन, नंदा पाटील, विद्या चौधरी, वैशाली झांबरे. व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.