Header Ads

Header ADS

बजाज यांच्या स्मरणार्थ वडोदे प्र सावदा येथील जि. प.मराठी मुलांच्या शाळेत दप्तर वाटप

Bajāja-yān̄cyā-smaraṇārtha-vaḍōdē-pra-sāvadā-yēthīla-ji-pa-marāṭhī-mulān̄cyā-śāḷēta-daptara-vāṭapa

Bajāja-yān̄cyā-smaraṇārtha-vaḍōdē-pra-sāvadā-yēthīla-ji-pa-marāṭhī-mulān̄cyā-śāḷēta-daptara-vāṭapa


 बजाज यांच्या स्मरणार्थ वडोदे प्र सावदा येथील जि. प.मराठी मुलांच्या शाळेत दप्तर वाटप

लेवाजगत न्यूज वढोदे प्र. सावदा- तालुका यावल येथील  जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये बुधवार रोजी सकाळी महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने स्वर्गवासी मोहिनी किशोर बजाज व किशोर पेरूमल बजाज यांच्या स्मरणार्थ ३६ विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. बजाज यांचा मुलगा दीपक किशोर बजाज व शालेय समितीचे अध्यक्ष अजय दिगंबर सपकाळे सावदा येथील बाळू बुधो कोष्टी यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी सुभाष आत्माराम बोडदे, रवींद्र सोनवणे, सुलोचना चौधरी ,ज्ञानेश्वरी चौधरी, स्वयंसेविका ललिता समाधान सोनवणे, छाया मॅडम, भाग्यश्री मॅडम व विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दप्तर मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेमध्ये विध्यार्थ्यां मध्ये चेहऱ्यावर आनंद जाणवला. दोन वर्षापासून बजाज कुटुंब आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दप्तर व शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करीत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.