Header Ads

Header ADS

बद्रीनाथमधून थरकाप उडवणारा VIDEO समोर; पत्त्यांच्या बंगल्यासारखा डोंगर कोसळला, चमोली-बद्रीनाथ महामार्ग ठप्प

  बद्रीनाथमधून थरकाप उडवणारा VIDEO समोर; पत्त्यांच्या बंगल्यासारखा डोंगर कोसळला, चमोली-बद्रीनाथ महामार्ग ठप्प

लेवाजगत न्युज उत्तराखंड:-उत्तराखंडमधील (Uttarakhand Landslide) चमोलीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे.  यामुळे चमोली-बद्रीनाथ महामार्ग (Chamoli-Badrinath Highway) पूर्णपणे ठप्प झाला आहे. भूस्खलनामुळे पाताळ गंगा परिसरात खळबळ उडाली आहे. काही क्षणात डोंगराला तडे जाऊन डोंगर मातीमोल झाला आहे. या डोंगराचा मलबा रस्त्यावर विखुरला असल्यामुळे जोशीमठ-बद्रीनाथ महामार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची बातमी आतापर्यंत नाही.

डोंगर कोसळल्यामुळे महामार्ग पूर्णत: ठप्प

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, येथून सतत डोंगर कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. आता चमोली जिल्ह्यातूनही डोंगर कोसळल्याचा विदारक व्हिडीओ समोर आला आहे. अगदी क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्यासारखा हा डोंगर कोसळला, डोंगर कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे NH-7 जोशीमठ-बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा महामार्ग बंद झाल्यामुळे चारधाम यात्रेला जाणाऱ्या काही भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोंगर कोसळल्याने सध्या रस्ता पूर्णपणे बंद आहे.

Generosity of Mahendra-Gharat-Dighode- Ambulance-to-the-village-to-give-basic-facilities-to-our-birth-in-the-Mahendra-Gharat

एक दिवस उलटत नाही तेच दुसरी दरड कोसळली

याआधी मंगळवारी, 9 जुलै रोजी जोशीमठ येथील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर भीषण दरड कोसळली होती. यातही संपूर्ण डोंगर पूर्णपणे कोसळला होता. दरड कोसळल्याने बराच मातीचा ढिगारा रस्त्यावर साचला. यानंतर बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. दरवर्षी पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये अनेक भागात डोंगर कोसळण्याच्या घटना घडतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.