Header Ads

Header ADS

स्वर्गीय कु.हर्षल मनोहर महाले याच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन

 

BJP-Teachers-Aghade's-Statement-to-Minister-of-Medical-Education-to-give-justice-to-the-family-of-late-Ku-Harshal-Manohar-Mahale.

स्वर्गीय कु.हर्षल मनोहर महाले याच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन

 कल्याण :(लेवाजगत न्यूज प्रतिनिधी)स्वर्गीय कु.हर्षल मनोहर महाले याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी जबाबदार डॉ.एन.वाय.तासगावकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स,भिवपुरी, ता.कर्जत, जि.रायगड या कॉलेज प्रशासनावर व कॉलेज व्यवस्थापनावर कारवाई करणे संदर्भात आज महाराष्ट्र  राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ साहेब यांना मंत्रालयात विनंतीवजा निवेदन दिले,चर्चाविनिमय केला आणि कठोर कार्यवाही संदर्भात मयत विद्यार्थ्याचे पालक प्राध्यापक मनोहर ओंकार महाले, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक  विकास पाटील सर आणि आणि प्रदेश कार्यकारीणी सदस्य एन.एम.भामरे सर यांनी आक्रमक व आग्रही भुमिका मांडली आणि सत्यशोधनासाठी आणि नैसर्गिक न्यायासाठी संबंधितांना पाठपुरावा व सखोल चौकशी करणेसाठी आदेशित करावे अशी मंत्री महोदयांना विनंती केली आणि त्यांनी तात्काळ मा.आयुक्त(वैद्यकीय शिक्षण) यांना विनंतीनुसार योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना केली...!





डॉ.एन.वाय.इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स,भिवपुरी,ता. कर्जत,जि.रायगड येथे प्रथम वर्ष एम. बी.बी.एस.साठी दि.२६.०९.२०२३ रोजी व्यवस्थापन कोट्यातून कु.हर्षल मनोहर महाले याने प्रवेश घेतला. प्रवेशावेळी मागणीनुसार व सुचनेनुसार  आवश्यक ते प्रवेश शुल्क,परीक्षा शुल्क,वसतिगृह शुल्क आणि इतर लाखो रुपये अतिरिक्त शुल्कही अदा केले आणि आपला प्रवेश निश्चित केला.परंतु  दुर्दैवाने काळाने झडप घातली आणि अवघ्या ६७ व्या दिवशी अर्थात दि.०१.१२.२०२३ रोजी संस्था संचालित वसतिगृहातच गळफास घेऊन त्याने संशयास्पदरित्या आत्महत्या केली... कॉलेज प्रशासनाने व व्यवस्थापनाने प्रकरण दडपण्यासाठी मुद्दामहून पालकांना आपला पाल्य सिरीयस आहे आपण तत्काळ कॉलेजला या असा निरोप दिला आणि आणि पालक वसतिगृह स्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिस पंचनामा करणे,पुरावे नष्ट करणे,सिव्हिल हॉस्पिटल,कर्जत येथे परस्पर उपचारासाठी नेणे,मृत घोषित करणे आणि शवविच्छेदन करणे आणि मृतदेह आईवडिलांच्या ताब्यात देण्यासाठी अतिघाई करणे हे सर्व  अनाकलनीय,अनैसर्गिक व संशय निर्माण करणारं आहे.पालकांच्या मते हा निश्चितच घातपात असू शकतो,रॅगिंगचाही प्रकार असू शकतो त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करणेसाठी आणि सखोल चौकशी करुन न्याय मिळावा म्हणून मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा.उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नॅशनल मेडिकल कौन्सिल,नवी दिल्ली यांना यापूर्वीच निवेदन दिलेले आहे...!

कु.हर्षल मनोहर अहिरे यांच्या संशयास्पद आत्महत्येस वसतीगृहातील त्याचे रूममेट आणि केवळ वसतिगृह अधीक्षक,कॉलेज प्रशासन व कॉलेज व्यवस्थापन जबाबदार आहे...वसतिगृहात सुरक्षिततेचे व सुरक्षेचे उपाययोजना न करणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज न मिळणे,विद्यार्थ्यांचं उपस्थिती पत्र उपलब्ध नसणं.पालकांचा संदेश व संपर्काठी व्हॉटस्ॲप ग्रुप नसणं, मेडिकल कॉलेज असून मुलांना वैद्यकीय सुविधेचा लाभ न मिळणं इत्यादि बाबी कॉलेज व्यवस्थापनाचा,प्रशासनाचा व अधीक्षकांचा बेजबाबदारपणा, बेदरकारपणा व निष्काळजीपणा सिद्ध करण्यास पुरेशा आहेत...त्याचप्रमाणे मृत मुलाच्या पालकांनी व मित्रमंडळींनी कॉलेज प्रशासनाशी व व्यवस्थापनाशी सुसंवाद व सुसंपर्क साधण्याचा अनेकवेळा अयशस्वी प्रयत्न केला.प्रकरण मा.मुंबई हायकोर्टात न्याय प्रविष्ट आहे म्हणून प्रशासनाने नेहमीच विचारलेल्या आर्थिक प्रश्नांची,प्रकरणाशी संबंधित शंकांची व संचालक मंडळास भेटण्यासाठीची वेळ मागितली पण कायमच उडवाउडवीची उत्तरे दिली,चालढकल केली,टाळाटाळ केली.प्रत्येकवेळी तासनतास बसवून ठेवलं,ना कधी सहकार्य केलं,ना कधी आस्थेने चौकशी केली जणू आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही अशा आविर्भावात त्यांचं वर्तन राहिलं आहे. आजतागायत व्यवस्थापनाशी प्रत्यक्ष ना कधी प्रत्यक्ष संपर्क झाला,ना कधी समोरासमोर संवाद झाला.त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ,बेचैन व चिंताग्रस्त आहे....अत्यंत बेफिकीर,बेपर्वा,बेमुर्वत  मुजोर,मस्तवाल व असंवेदनशील व्यवस्थापन असल्याची पालकांची धारणा झाली आहे. त्यामुळे संबंधितांना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे.त्यांचेवर कारवाई होणं अत्यावश्यक आहे तरच मुलांचं भविष्य सुरक्षित राहील आणि शिक्षणाचं पवित्र कार्य घडून येईल आणि शिक्षणाचं पावित्र्य टिकून राहील.नाही तर भविष्यात याहून अधिक भयावह घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा पत्रप्रपंच...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.