Header Ads

Header ADS

भाजपा मस्कावद -थोरगव्हाण गट संयोजकपदी जितेंद्र चौधरी सरयांची निवड

 

BJP-Maskavad-Thoragavan-Group-Election-of-Jitendra-Chowdhary-Sir-as-Convenor-Post

भाजपा मस्कावद -थोरगव्हाण गट संयोजकपदी जितेंद्र चौधरी सरयांची निवड

लेवाजगत न्यूज सावदा- लहान वाघोदा तालुका रावेर येथील रहिवासी युवा नेतृत्व श्री जितेंद्र चौधरी सर यांची भारतीय जनता पक्षाच्या मस्कावद - थोरगव्हाण जिल्हा परिषद गटाच्या संयोजकपदी  निवड करण्यात आली . जितेंद्र चौधरी सरांचा जन्म एका साधारण घराण्यात झाला कुठलाही राजकिय वारसा नसतांना जितुसरांचा सर्वसाधारण कार्यकर्ता पासून सुरू झालेला प्रवास त्यांची साधी राहणीमान तसेच जनतेशी असलेली नाळ परिसरात गाव खेड्यात सर्वांशी संपर्क असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची  भाजपा पक्षाने मस्कावद - थोरगव्हाण गट संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली .





        जितेंद्र चौधरी सरांनी याआधी युवा मोर्चा शाखा अध्यक्ष , युवा मोर्चा तालुका चिटणीस , युवा मोर्चा सरचिटणीस , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष , भाजपा रावेर तालुका चिटणीस , गण प्रमुख व गट प्रमुख या पदांवर काम केलेले आहे. गत २५ वर्षांपासून भाजपा पक्षाशी एकनिष्ठ असलेले श्री . जितुसरांची भाजपा पक्षाने मस्कावद - थोरगव्हाण गट संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. याआधी सुध्दा गटप्रमुख म्हणून जितुसरांनी काम केलेले असल्याने या गटात येणाऱ्या 26 गावातील जनतेशी सरांचा दांडगा संपर्क आहे . ही निवड विधानसभा निवडणूक समोर ठेवून झालेली असल्याने पक्षश्रेष्ठी जे - जे जबाबदारी माझ्या कडे सोपविल ते मी निश्चितपणे पक्षश्रेष्ठींच्या व जनतेच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल .या निवडीनंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खा. रक्षाताई खडसे , ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन , जळगाव पूर्व जिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ जावळे , किसान मोर्चा प्रदेश संयोजक सुरेशभाऊ धनके , रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन , जिल्हा सरचिटणीस हरलालभाऊ कोळी , जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन , राजेंद्रभाऊ चौधरी , प्रल्हादभाऊ पाटील , मुक्ताईनगर सहक्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील , तालुका अध्यक्ष महेशभाऊ चौधरी  अनेक राजकीय मंडळी तसेच हितचिंतक यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.