Header Ads

Header ADS

मोठी बातमी! अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू


  मोठी बातमी! अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू


लेवाजगत न्युज अकोला: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेले मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते. 


राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकर यांचाही सहभाग होता. या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.