Header Ads

Header ADS

आमच्या परिसरातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही त्यांचे विज बील बिनशर्त माफ़ करा - धनंजय चौधरी

 

Āmacyā-parisarātīla-śētakaṟyānvara-hōṇārā-an'yāya-sahana-karaṇāra-nāhī-tyān̄cē-vija-bīla-binaśarta-māfa-karā-dhanan̄jaya-caudharī

आमच्या परिसरातील शेतकऱ्यांनवर होणारा अन्याय सहन करणार नाही त्यांचे विज बील बिनशर्त माफ़ करा - धनंजय चौधरी





लेवाजगत न्यूज सावदा - राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने (२०२४) अंतर्गत ७.५ एच पी पर्यंत च्या शेती पंपचे थिकीत वीज बील माफ करण्यात यावे असा शासन निर्णय केला आहे.

     रावेर - यावल तालुका परिसर तर प्रामुख्याने केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याना योजनेचा काही ही लाभ होऊ शकत नाही. त्याचे कारण असे की, पाण्याची पातळी खोलावर गेली असल्याने आपल्या परिसरात १० एच पी किंवा १५ एच पी चे पंप वापरले जाता. 

त्यासंदर्भात आज महाविकास आघाडी तर्फे रावेर तहसील कार्यालयात १० एच.पी. व १५ एच.पी. पंपाचा सुद्धा समावेश या योजनेत करण्यात यावा व याने शेतकर्यांवर होणारा अन्याय टळेल असे निवेदन नायब तहसीलदार श्री संजय तायडे यांना देण्यात आले.

यावेळी सोबत काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील,कृ.ऊ.बा.समिती रावेर उपसभापती योगेश पाटील,रावेरचे माजी नगराध्यक्ष मा.श्री.हरिशशेठ गणवाणी,माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील,राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेल तालुकाअध्यक्ष सुनिल कोंडे,एन.एस.यु.आय जिल्हाअध्यक्ष भुपेंद्र  जाधव,राहुल महाजन,परवेज भाई उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.