Header Ads

Header ADS

लाखो रुपये खर्च करून सावदा शहरावर नजर ठेवण्यासाठी बसवलेला तिसरा डोळा देखभाल दुरुस्ती अभावी बंद,देखभाल दुरुस्ती पोलीस करणार का पालिका यावर मंथन सुरू

 

After spending lakhs of rupees, the third eye installed to keep an eye on Savada city will be closed due to lack of maintenance.


लाखो रुपये खर्च करून सावदा शहरावर नजर ठेवण्यासाठी बसवलेला तिसरा डोळा ,देखभाल दुरुस्ती अभावी बंद

देखभाल दुरुस्ती पोलीस करणार का पालिका यावर मंथन सुरू

लेवाजगत न्यूज शाम पाटील सावदा- वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक वर्दळीच्या,सार्वजनिक ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी २०२२ मध्ये नगरपालिकेने  पालिका फंडातून  तब्बल साडेपाच लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.  कायद्याचा हा तिसरा डोळा काही दिवसापासून बंद झाला आहे.  शहरातील २५ ठिकाणी लावलेल्या कॅमेरे देखभाल दुरुस्ती न झाल्या मुळे बंद पडली आहेत. या मुळे शहरात काही विपरीत घटना घडल्यास पोलिसांना तपसासाठी खाजगी घरांची किंवा दुकान चालकांची सीसीटीव्ही फुटेज साठी दारे ठोठावी लागतात.





सावदा शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते अनेक छोट्या मोठ्या घटना शहरात घडत असतात त्यांचा मागवा व आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. परंतु सीसीटीव्ही फुटेज च्या दुरुस्ती कडे लक्ष न देता पालिका प्रशासनाने शहराची सुरक्षितता वाऱ्यावर सोडली आहे. शहरातील २३ चौकांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत यांचा नियंत्रण कक्ष सावदा पोलीस ठाण्यात उभारण्यात आला आहे. यातून संपूर्ण शहरावर हा तिसरा डोळा लक्ष ठेवणे सुरू झाले होते. पोलिसांनाही आरोपीचा शोध घेण्यासाठी मोलाची मदत होऊ लागली. परंतु देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले. नादुरुस्त कॅमेऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केल्यानंतरही काही दिवसातच ते बंद पडल्यामुळे कॅमेऱ्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देखपाल दुरुस्ती पालिका प्रशासनाने करावी का पोलीस प्रशासनाने करावी यावर दोघं प्रशासनांमध्ये मंथन सुरू आहे.

सावदा शहर जगातील सर्वात मोठी केळीची बाजारपेठ आहे. यामुळे देशभरातून या ठिकाणी केळी वाहतुकीसाठी मोठी वाहने येजा करीत असतात व छोटे मोठे अपघात घडत असतात सीसीटीव्ही फुटेजचा आसरा घेऊन पोलिसांना आरोपीचा शोध घ्यायला मदत होते त्यामुळे ही सीसीटीव्ही फुटेज तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

      सावदा शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत सावदा पालिका कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च करू शकत नाही आता पोलीस प्रशासनाने कॅमेरे हस्तांतर करून त्यांची दुरुस्ती व देखभाल करावी.

-भूषण वर्मा 

मुख्याधिकारी नगरपालिका सावदा ता. रावेर

  पोलीस ठाण्यामध्ये असा कुठलाच देखभाल दुरुस्ती करावी म्हणून निधी उपलब्ध नसल्याने आम्हाला प्रश्न पडला आहे की या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे देखभाल दुरुस्ती आम्ही कशी करू शकू याबद्दल आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती मागवून त्याबाबत पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहोत -सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.