Header Ads

Header ADS

सावदा पोलीस ठाण्याची सपोनि विशाल पाटील यांनी स्वीकारली सुत्रे

 सावदा पोलीस ठाण्याची सपोनि विशाल पाटील यांनी स्वीकारली सुत्रे 

लेवाजगत न्यूज सावदा - येथील पोलीस ठाण्याची सूत्रे मंगळवार रात्री  सहायक पोलीस निरिक्षक विशाल पाटील यांनी स्वीकारली .

API-Vishal-Patil-accepted-sutras of Savada-Police-Station

iti


    सावदा पोलीस ठाण्याचे  सपोनि जालींदर पळे यांची  बदली  कोल्हापूर येथे झाली होती. यामुळे त्यांच्या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने पळे यांच्या जागेवर सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल पाटील यांची नियुक्ती करण्यात झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

   सावदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हे प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.


   सावदा पोलीस ठाण्यात कार्यभार स्वीकारताच एपीआय विशाल पाटील यांचे पोलिस बांधवांनी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.