Header Ads

Header ADS

शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांचे दुःखद निधन स्मृतीप्रित्यर्थ सावदा येथे श्रद्धांजली सभा

 

A-ni-pa-poo-shastri- Bhaktikishordas-ji's-sad-passing-smritiprityartha-savda-here- tribute-meeting

अ.नि.प.पू.शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांचे दुःखद निधन स्मृतीप्रित्यर्थ सावदा येथे श्रद्धांजली सभा

लेवाजगत न्यूज सावदा-येथील स्वामिनारायण मंदिरचे प्रमुख कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे २८ जून २०२४ रोजी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. अल्पवयात त्यांचं जाणं ही घटना हृदयाला चटका लावणारी आहे.


ITI


    त्यांच्या निधना निमित्त दि. ७ जुलै २०२४ रोज रविवार या दिवशी कोचुर रोड वरील कुलसुमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी १ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प. पू. स. गु. शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व स्नेही जनांना या शोकसंदेशाद्वारे कळविण्यात येत आहे की, सदर सभेस सर्व संप्रदायातील संत महंत अनुयायी उपस्थित राहणार असून आपणही आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन प. पू. स. गु. शा. स्वामी धर्मप्रसाददासजी, प. पू. स. गु. शा. स्वामी भक्तिप्रकाशदासजी व समस्त खान्देश संत व सत्संग समाज, श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा. श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदा यांचे कडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.