Header Ads

Header ADS

पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर १२ वर्षीय तरुणीचा अपहरण करण्याचा प्रयत्न असफल

 

पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर १२ वर्षीय तरुणीचा अपहरण करण्याचा प्रयत्न असफल


लेवाजगत न्युज पाचोरा:-जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बारा वर्षीय मुलीला रात्री झोपेत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जवळच तिची आई देखील झोपलेली होती, मुलीने त्याचवेळी आईच्या साडीचा पदर ओढल्याने आईला जाग आली. याप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ITI


मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यां सोबत झोपलेली होती. झोपेत असलेल्या बारा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयित आरोपी विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना मुलीने शेजारी झोपलेल्या आईच्या साडीचा पदर ओढला व आईला जाग आली.


आईने आरडाओरड करताच संशयित आरोपीने तेथून पळ काढला. संशयिताचा मुलीच्या नातेवाइकांनी शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच त्यांनीही तपासाचे चक्र गतिमान करत त्याचा शोध घेतला. आरोपीला ताब्यात घेत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.