Header Ads

Header ADS

डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे वारकऱ्यांची सेवा

 

Dr-Ravindra-Bhole-Arogya-Seva-Centre-Servicing-Variants

डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे वारकऱ्यांची सेवा

JTM


लेवाजगत न्यूज उरुळी कांचन: जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविक भक्त वारकऱ्यांना डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे डॉ. रवींद्र भोळे यांनी आरोग्य विषयक तपासणी करून विनामूल्य औषधोपचार केलेत. त्याचप्रमाणे वारकऱ्यांना वेदनाक्षमक मलमांचे वाटप व नी कॅप वाटप करण्यात आले. सकाळपासून ते दिवसभर विविध दिंड्यातील वारकऱ्यांना दिवसभर आरोग्यसेवा करण्यात आली.  यावेळी डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र हे दिवसभर विनामूल्य करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेर तापी तीर श्री गुरुदत्त दिंडी चोपडा जळगाव पालखीतील भाविक भक्त वारकऱ्यांना ही औषधोपचार करण्यात आले. खानदेश जळगाव मित्र मंडळ जळगावकर व मातोश्री हॉटेल ग्रुप यांनी वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. याप्रसंगी अन्नदानाचा कार्यक्रम झाला. दिंडीचे प्रमुख ह भ प पाटील महाराज यांचाजेष्ठ समाजसेवक प्रवचनकार हभप डॉ. रवींद्र भोळे यांनी पुष्पहार देऊन सन्मान केला. नितीन चांगदेव कुंजीर मेडिकल्स यांनी औषधांसाठी सहकार्य केले.  जळगाव खान्देश मित्र मंडळ जळगावकर ग्रुप व मातोश्री हॉटेल ग्रुप यांचे वतीने श्री प्रदीप नारायण चव्हाण, श्री सागर शेठ कुल, श्री अशोक काशिनाथ चौधरी, श्री जीवन शिवाजी पाटील, श्री कपिल शिवाजी पाटील, श्री दीपक सोपान फेगडे, श्री अतुल गुजर, श्री नरेंद्र कोल्हे, विजय सुरेश वारके ह्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ह्यावेळी डॉ. रवींद्र भोळे यांनी प्रवचन सेवा दिली. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हभप डॉ. रवींद्र भोळे संस्थापक डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन, उरुळी कांचन, चेतन सोनवणे प्रिन्सिपल एंजल हायस्कूल, डॉ.विनय बोरावले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Iti


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.