Header Ads

Header ADS

रील्स बनवण्यासाठी मी पण कार चालवून बघते, तू शूटिंग कर,' शूलिभंजन डोंगरावरून कार ५०० मी. दरीत कोसळली; युवती ठार

To-make-reels-I-also-drive-the-car-and-see-you-shooting-the-car-500-m-from-Shulibhanjan-hill-falls-into-the-valley-killing-girl


 रील्स बनवण्यासाठी मी पण कार चालवून बघते, तू शूटिंग कर,' शूलिभंजन डोंगरावरून कार ५०० मी. दरीत कोसळली; युवती ठार 

To-make-reels-I-also-drive-the-car-and-see-you-shooting-the-car-500-m-from-Shulibhanjan-hill-falls-into-the-valley-killing-girl


लेवाजगत न्यूज  खुलताबाद-शूलिभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात मित्रासोबत मोबाइलवर रील्स बनवणे युवतीच्या जिवावर बेतले. कार चालवतानाची रील बनवताना श्वेता सुरवसे अॅक्सिलरेटरवर पाय पडून कार वेगाने ५०० मीटर खोल दरीत कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला. कार चक्काचूर झाली. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. श्वेता दीपक सुरवसे (२३) रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. श्वेता सुरवसे आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (२५, रा. हनुमाननगर) हे छत्रपती संभाजीनगर येथून कारने (एमएच २१ बीएच ०९५८) शूलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले. या ठिकाणी ते मोबाइलवर फोटो काढण्यासह रील्स बनवत होते. श्वेताने शिवराजला 'मी पण कार चालवून बघते, तू शूटिंग कर,' असे म्हणत ती ड्रायव्हिंग सीटवर बसली. या वेळी कार चालू करून ती रिव्हर्स गिअरमध्ये मागे नेत होती. मात्र दरी जवळ आली तरी तिला ब्रेक दाबता न आल्याने कार दरीत कोसळली.

       'थांब' म्हणेपर्यंत कार दरीत कार दरीत पडण्याची शक्यता दिसताच शिवराज श्वेताला 'थांब थांब' असे जोरात ओरडला. पण तोपर्यंत कार डोंगरावरून कलंडून ५०० मीटर खोल दरीत कोसळली आणि श्वेता जागीच ठार झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.