Header Ads

Header ADS

सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन


 सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन

लेवाजगत न्युज सावदा (प्रतिनिधी) :- सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी (वय ४५) यांचे दि.२८ रोजी सकाळी ७ वा भुसावळ येथील खाजगी रिदम या रुग्णालयात हृदयविकाराचे तीव्र झटक्याने निधन झाले.

  सावदा स्वामीनारायण मंदिराचे कोठारी व येथील स्वामीनारायण गुरुकुलचे मा. उपाध्यक्ष होते. त्यांनी वेदांतव्याकरण या विषयावत संस्कृत या विषतात डबल पी. एच. डी केली होती.

 ते भागवत कथाकार देखील होते. त्यांनी सावदा सह परिसरात द्वारका, हरिद्वार, काशी आदी विविध ठिकाणी मोठ्या कथेचे आयोजन केले होते, त्याचे कथान हजारोच्या संख्येने भाविक उवस्थित राहत असत. त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे कार्य या भागात केले.

 हिंदू धर्माचे प्रचार तसेच सर्व धर्माचे समरसते मध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता, त्यांना संस्था व स्तरावरील मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते, त्यानी स्वामीनारायण संप्रदायाचे विविध गुजराती ग्रंथ मराठीत व हिंदीत अनुवादित केले होते, त्यांचेवर गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे वडतालधाम येथे दि 29 रोजी संतपरंपरे प्रमाणे विधिवत समाधी देण्यात येणार आहे या घटनेमुळे सावदा व परिसर तसेच विविध ठकाणी असलेले त्यांचे भक्त शोकसागरात बुडाले आहे.

त्यांना लेवा जगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.