Header Ads

Header ADS

रक्षा खडसे २लाख ७२हजार १८३ मते जास्त घेऊन विजयी- असे मिळाले खडसे व पाटील यांना विधानसभा मतदार संघ निहाय मते

 

Raksha-Khadse-Khadse-and-Patil-victory-by-getting-more-2 lakh-72-thousand-183-votes-in-the-constituency-wise-in-the-assembly-votes

रक्षा खडसे २लाख ७२हजार १८३ मते जास्त घेऊन विजयी- असे मिळाले खडसे व पाटील यांना विधानसभा मतदार संघ निहाय मते

 लेवाजगत न्यूज सावदा- रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झाली.प्रथम टपाली मतदान मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पहिल्या फेरीत सुरुवात झाली, एकूण२४फेऱ्या झाल्या . या संपूर्ण मतदान फेऱ्यां मध्ये रक्षा खडसे या दोन लाख ७२ हजार १८३ अधिक मते घेऊन विजयी झाल्या यांना निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

    प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मतदार संघ निहाय किती मते मिळाली ही संपूर्ण  आकडेवारी देत आहोत. रक्षा खडसे यांना ६ लाख ३०हजार ८७९  मते तर श्रीराम पाटील यांना ३लाख५८हजार६९६ मते मिळाली असून चोपडा विधानसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना ११७३१९ तर श्रीराम पाटील यांना ५३६७७ ,रावेर विधानसभा मतदारसंघात १०७४२७ तर श्रीराम पाटील यांना ७१६९६, भुसावळ विधानसभा मतदारसंघात खडसे यांना ९५१९२ तर श्रीराम पाटील यांना ५३७३२, जामनेर विधानसभा मतदारसंघात रक्षा खडसेंना १०५०९२ तर श्रीराम पाटील यांना ६८४१२, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात १०२०६१ रक्षा खडसे यांना तर ५५१३२ मतदान श्रीराम पाटील यांना मिळाले आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघात १०२४६७ रक्षा खडसे यांना तर ५५३८१ मते श्रीराम पाटील यांना मिळाले आहे.पोस्टल मतदान रक्षा खडसे यांना १३२१तर श्रीराम पाटील यांना ६६६मते मिळाले आहे.असे एकूण श्रीमती रक्षा निखिल खडसे या भाजपच्या उमेदवार यांना ६३०८७९ मते मिळाले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांना ३५८६९६ मते मिळाली आहेत.या  रावेर लोकसभा निवडणुकीत श्रीमती  रक्षाताई खडसे या

दोन लाख ७२ हजार १८३ मतांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे या विजयी झाल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.