Header Ads

Header ADS

११० व्या पाटोत्सव निमित्त आज स्वामीनारायण मंदिरातर्फे जल कलश यात्रा भाविकांनी सहभागी व्हावे कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांचे आवाहन

On the occasion of the 110th Patotsav today, the Jal Kalash Yatra by Sri Swaminarayan Temple invites the devotees to participate in Kothari Shastri Bhakti Kishore Dasji's appeal.


 ११० व्या पाटोत्सव निमित्त आज स्वामीनारायण मंदिरातर्फे जल कलश यात्रा भाविकांनी सहभागी व्हावे कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांचे आवाहन 

लेवाजगत


लेवाजगत न्यूज सावदा-वडतालधाम द्विशताब्दी महोत्सव अंतर्गत सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराने १६ जूनला 'श्रीहरी अंतर्धान दिवस' या दिवशी मंदिराचा ११०वा पाटोत्सव(वर्धापन दिन) सोहळा आचार्य राकेश प्रसाद दाजी यांच्या आशीर्वादाने सद्गुरु भक्ती प्रकाश दासजी ,धर्म स्वरूप दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी, सत्यप्रकाश स्वामी, लक्ष्मीनारायण स्वामी ,अनंत प्रकाश दासजी, माधव भंडारी याच्या उपस्थितीत कार्यक्रमात होईल. यानिमित्त देवाचा अन्नकूट उत्सव होऊन ५६ भोग नैवेद्य दाखवला जातो. आज संध्याकाळी साडे पाच वाजता ग्राम प्रदक्षिणा होणार आहे. त्या जल कलश यात्रेत सर्व हरिभक्त भाविक भक्त बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांनी केले आहे.

केशरजल, पंचामृताने होणार मंगल अभिषेक

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने १५ जूनला शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता कलश यात्रा काढण्यात येईल. विठ्ठल मंदिर ते स्वामीनारायण मंदिर असा कलशयात्रेचा मार्ग असेल. यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जूनला रविवारी सकाळी ६.३० ते ७ या काळात भगवत पूजन होईल. ७ ते ८.४५ अभिषेक दर्शन, ९ ते १० सत्संग सभा, १०.१५ वाजता अन्नकूट आरती, १०.३० वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. सर्व हरिभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्वामीनारायण मंदिराचे कोठारी आणि सर्व ट्रस्टींनी केले आहे.

पाटोत्सव म्हणजे मंदिराचा वर्धापन दिवस असतो. त्याला वार्षिक कार्यक्रम असेही संबोधले जाते. त्यात अभिषेक दर्शनामध्ये पवित्र नद्यांचे शुद्ध जल, केशर जल, फळांचा रस, पंचामृताने देवांचा अभिषेक होतो. हा विधी तासभर चालतो. यानंतर अन्नकूट कार्यक्रम होतो. त्यात देवाला ५६ भोग नैवेद्य दाखवला जातो. त्यात सर्व प्रकारची व्यंजने असतात. नंतर सत्संग होतो. सत्संग झाल्यावर छपन्न भोग आरती होते, अशी माहिती शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.