Header Ads

Header ADS

नितीश कुमार आणि चंदाबाबू नायडू यांचे NDA ला समर्थन, नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा


 नितीश कुमार आणि चंदाबाबू नायडू यांचे NDA ला समर्थन, नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा


लेवाजगत न्युज मुंबई:-  : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार बनण्याची तयारी सुरू आहे. एनडीएच्या बैठकीमध्ये संयुक्त जनता दलचे नितीश कुमार आणि तेलगु देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए आता राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.  

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया आघाडील 234 जागा मिळाल्या आहेत. एनडीएमध्ये 240 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतकं संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एनडीएच्या नेतृत्वाखाली आता मोदींना सत्ता स्थापन करावी लागणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस 99 जागांसह इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. तर समाजवादी पक्षाला 37 तर टीएमसीला 29 जागा मिळाल्या आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.