Header Ads

Header ADS

निफाड मध्ये सुखोई विमान कोसळले दोन्ही वैमानिकांचे पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडल्यामुळे प्राण वाचले

Nifad-in-Sukhoi--plane-crashes-both-pilots-saved-life


 निफाड मध्ये सुखोई विमान कोसळले दोन्ही वैमानिकांचे पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडल्यामुळे  प्राण वाचले

लेवाजगत न्यूज नाशिक-नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई -30 विमान कोसळले आहे. सुदैवाने विमान कोसळण्यापूर्वीच विमानातील दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका शेतात सुखोई -30 लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर लगेचच त्याला आग लागली. या विमानात 2 वैमानिक होते. त्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच पॅराशूटने विमानाबाहेर उडी मारल्यामुळे ते बचावलेत. हे दोघे वैमानिक किरकोळ जखमी झालेत. त्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक रेंजचे विशेष महानिरीक्षक डी आर कराळे यांनी ही माहिती दिली.

 सूत्रांच्या माहितीनुसार, हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले असल्याची शक्यता आहे. या अपघाताची माहिती मिळताच एचएएल येथील टीमने घटनास्थळी धाव घेतली. हे विमान द्राक्षाच्या एका बागेत कोसळले आहे. त्यामुळे या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

    भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 लढाऊ विमानांचा पुण्यात तळ आहे. अपघातग्रस्त विमानाने तेथूनच उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, याबाबत अधिकृत माहिती नाही. स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.