धुळ्यातून मोठी बातमी:-मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे
धुळ्यातून मोठी बातमी:-मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे
लेवाजगत न्युज धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे काही निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत, त्याचा फटका बसल्याने आपला निवडणुकीत पराभव झाल्याचं माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) म्हणाले. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात लीड घेऊनही एका मतदारसंघात मोठा फटका बसल्याने पराभव झाला असंही ते म्हणाले. सुभाष भामरेंनी या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभारही मानले. (Dhule_loksabha)
जाहिरात
धुळ्यात चुरशीच्या लढतीत भामरेंचा पराभव
निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र नंतर मात्र पूर्ण बदलले. 'एमआयएम'ने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणे, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान निर्माण केले होते. भाजपचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत झाली. सुरुवातीला डॉ. सुभाष भामरे हे आघाडीवर होते. मात्र, नंतर शोभा बच्छाव यांनी आश्चर्यकारकरीत्या सुभाष भामरे यांच्यावर आघाडी घेतली आणि शोभा बच्छाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय झाला.
उत्तर महाराष्ट्रात भाजपला फटका
उत्तर महाराष्ट्रात महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर महाविकास आघाडीने सहा जागांवर कब्जा केला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत भाजपला सहा जागा तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदान
धुळे ग्रामीण
शोभा बच्छाव : 76 हजार 266
सुभाष भामरे : 1 लाख 40 हजार 505
धुळे शहर
शोभा बच्छाव : 88 हजार 438
सुभाष भामरे : 93 हजार 262
शिंदखेडा
शोभा बच्छाव : 68 हजार 424
सुभाष भामरे : 1 लाख 11 हजार 849
मालेगाव मध्य
शोभा बच्छाव : 1 लाख 98 हजार 869
सुभाष भामरे : 4 हजार 542
मालेगाव बाह्य
शोभा बच्छाव : 72 हजार 242
सुभाष भामरे : 1 लाख 27 हजार 454
बागलाण
शोभा बच्छाव : 78 हजार 253
सुभाष भामरे : 10 हजार 166
पोस्टल
शोभा बच्छाव : 1 हजार 374
सुभाष भामरे : 2 हजार 257
एकूण मते
शोभा बच्छाव : 5 लाख 83 हजार 866
सुभाष भामरे : 5 लाख 80 हजार 35
कोणत्याही टिप्पण्या नाहीत