Header Ads

Header ADS

मला आता भाजपा मध्ये जाण्याची घाई नाही,संकटामोचकांचे श्रम कुठे गेले -आ.एकनाथ खडसे

 

मला आता भाजपा मध्ये जाण्याची घाई नाही

मला आता भाजपा मध्ये जाण्याची घाई नाही,संकटामोचकांचे श्रम कुठे गेले -आ.एकनाथ खडसे 

लेवाजगात न्यूज जळगाव -लोकसभेच्या निकालानंतर राज्यात आता महाविकास आघाडीची मोठी ताकद निर्माण झाली आहे. राज्यातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या आहेत. तर महायुतीला फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यानिकालानंतर आता भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याची आता मला कोणतीही घाई नाही असे विधान केले. तर उत्तर महाराष्ट्रात विजयासाठी श्रम घेणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कुठे गेले, असा सवाल देखील त्यांनी करत महाजनांना टोला लगावला.

  एकनाथ खडसे यांनी निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं सांगत राहिले. परंतु त्यांच्या प्रवेशावर भाजपच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला. याठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यात. परंतु राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर मला आता भाजपमध्ये जाण्याची घाई नाही, असे विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. 

राज्यातील राजकारण लोकांना आवडलं नाही 

एकनाथ खडसे म्हणाले की, मागच्या निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले होते. परंतु यावेळेस त्यांना कमी मतदान झालं आहे. त्याचा फटका राज्यात महायुतीला बसलाच. परंतु केंद्रात देखील नरेंद्र मोदी यांना बसला आहे. आता मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालाय. यातच अलिकडच्या काळातील राज्यातील राजकीय वातावरण पाहिलं तर ते लोकांना आवडलेलं दिसून आले नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले. तर त्यांनी फडणवीसांना एक प्रकारे टोला लगावला. 

कार्यकर्त्यांमध्ये माझ्या येण्याचा उत्साह 

पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा आम्ही जिंकल्या आहेत. माझ्या पक्ष प्रवेशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. यातच याठिकाणी आधीच भाजपची ताकद होती. त्यानंतर आमची देखील याठिकाणी ताकद झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.