Header Ads

Header ADS

खासदार रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास कोथळीच्या सरपंच ते केंद्रीय मंत्री

MP-Raksha-Khadse's-political-journey-from-Sarpanch-of-Kothali-to-Central-Minister


खासदार रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास कोथळीच्या सरपंच ते केंद्रीय मंत्री

लेवाजगत न्यूज -सलग तीन वेळा लोकसभेत विजयी, जाणून घ्या रक्षा खडसेंची राजकीय कारकीर्द जळगावच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेल्या खडसे कुटुंबीयांच्या भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. यात रक्षा खडसेंची वर्णी लागली आहे. केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागलेल्या रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया दरम्यान रक्षा खडसे यांचा जन्म १२ मे १९८७ रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.


तेव्हाही पक्षात राहिल्या


एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दउिल्यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहत पक्षाचे काम सुरू ठेवले. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसेंनी म्हटले होते.


अन् खडसेंनी वचपा काढला.


२०११ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनिष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत

पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरु झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला पोहोचला होता. रक्षा खडसे यांनी २०१४ च्या निवडणुकीत एकप्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता.


मनिष जैन यांचा केला पराभव


२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रावेर मतदारसंघातून मनिष जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. भाजपकडून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळालेली होती. अशात, ईश्वरलाल जैन यांनी ही निवडणूक खडसेंविरोधात असती तर मजा आली असती, असं वक्तव्य केले. खडसेंनी ते मनावर घेतलं. विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि प्रदेश भाजपातील महत्त्वाचे नेते म्हणून खडसेंच्या शब्दाखातर हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली. त्यांच्याऐवजी खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा दणदणीत पराभव केला होता.


राजकीय कार्य पुढीलप्रमाणे

१- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील कोथळीच्या सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.


२-जिल्हा परिषद - जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष (सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,

३-२०१४ ते २०१९ पर्यंत पहिल्यांदा खासदार

४-२०१९ ते २०२४ पर्यंत दुसऱ्यांदा खासदार


५- २०२४ साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या

संदर्भ-दिव्यमराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.