Header Ads

Header ADS

जळगाव जिल्ह्यातील रावेरातील युवक खेळतोय टी-20 विश्वचषक "australia vs oman"


 जळगाव जिल्ह्यातील रावेरातील  युवक खेळतोय टी-20 विश्वचषक "australia vs oman"

Nirmala-Ravindra-Chaudhary-passed-away-from-illness


लेवाजगत न्युज रावेर:- सध्या आयसीसी टी-20 (icc t20) विश्वचषक 2024 क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. अशात या स्पर्धेच्या निमित्ताने जळगावच्या रावेर तालुक्यातील  (jalgaon news) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील आठवले कुटुंबातील प्रतीक आठवले या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याला आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये ओमान संघाकडून (oman cricket team) प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

  प्रतीक हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील असल्याने त्याचे हे यश जळगावकरांची मान उंचवणारे आहे.


सध्या अमेरिका व वेस्टइंडीजमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत यावर्षी पहिल्यांदाच ओमान संघ सहभागी झाला आहे. ओमानच्या या संघात मूळचा जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यात असलेला प्रतीक आठवले याला संधी मिळाली आहे.


प्रतीक आठवले हा गेल्या चार वर्षाआधी क्रिकेट खेळण्यासाठी ओमान येथे गेला होता. या दरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची ओमान या संघात निवड झाली. ऐवढेच देखील नाही तर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची संधी मिळालीय. प्रतीक आठवले हा विकेटकीपर बॅस्टमनपण आहे.


अशी मिळाली संधी


लहानपासूनच क्रिकेटची आवड असलेला प्रतीकने नाशिक येथे दहावीनंतर शिक्षण घेत असताना क्रिकेटचा सराव सुरु केला. मेहनतीच्या बळावर त्याने या क्षेत्रात चांगलं यश संपादन केलं. गोवा येथील एका स्पर्धेत खेळत असताना ओमान संघाच्या प्रशिक्षकाची प्रतीकवर नजर पडली. प्रतीकचा खेळ पाहून या प्रशिक्षकाने त्याला ओमान देशात क्रिकेट खेळण्यासाठी निमंत्रण दिले. प्रतीकने देखील ही संधी स्विकारली आणि तेव्हापासूनच तो ओमान संघात क्रिकेट खेळत आहे.

दरम्यान, अमेरिका व वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ही संधी त्याच्यासह त्याच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरली. प्रतीकच्या कुटुंबियांनी एकत्र बसून या सामन्याचा आनंद घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.