Header Ads

Header ADS

जळगावच्या पिता-पुत्राची नाशिक येथे आत्महत्या

 जळगावच्या पिता-पुत्राची नाशिक येथे आत्महत्या

Jalgaon-father-son-suicide-at-Nashik




Jalgaon-father-son-suicide-at-Nashik


लेवाजगत न्यूज नाशिक-येथे घरात मृतावस्थेत आढळून आलेल्या जळगावच्या पिता-पुत्राने नैराश्येतून औषधांचा अतिरिक्त डोस घेत आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृत व्यक्ती खासगी दवाखान्यात परिचारक म्हणून नोकरीस होता. जादा मात्रेत औषध घेतल्याने मृत्यू होऊ शकतो याची माहिती असल्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. दोघांचे व्हिसेरा राखून ठेवले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वासननगर येथील रहिवासी तुषार अरुण महाजन (४०) आणि मुलगा कार्तिक (१२) हे बाप-लेक भाचा हर्षल चौधरी यांना बेडरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. चौधरी यांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

पत्नी मुलीच्या मृत्यूने नैराश्य

 महिन्याभरापूर्वी महाजन यांची मुलगी हर्षदा (९) हिचा निमोनियामुळे मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूचा धक्का महाजन यांची पत्नी स्वाती (३५) यांना सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. पत्नी मुलगी सोडून गेल्याने बाप लेक नैराश्येत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.