Header Ads

Header ADS

चौथ्यांदा मिळणार जळगाव जिल्ह्यास केंद्रीय मंत्रीपदाची संधी !

Jalgaon-District-Central-Ministership-opportunity-for-the-fourth-time!


चौथ्यांदा मिळणार जळगाव जिल्ह्यास केंद्रीय मंत्रीपदाची संधी !

लेवाजगत न्यूज सावदा- रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे या केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून या माध्यमातून असा सन्मान मिळवणार्‍या त्या जळगाव जिल्ह्यातील चौथ्या तर तापी खोऱ्यातील पहिल्या दिवशी मान्यवर बनणार आहेत.

Jalgaon-District-Central-Ministership-opportunity-for-the-fourth-time!


    आजवर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी या आधी जिल्ह्यातील तीन मान्यवरांना मिळालेली आहे. तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरीभाऊ पाटसकर यांनी १९५५ ते १९५७ च्या दरम्यान आधी कायदामंत्री आणि नंतर नागरी उड्डयन मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर १९७७ ते ७९ च्या दरम्यान जनता पक्षाचे तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जनता पक्षाचे खासदार सोनूसिंग धनसिंग पाटील यांना केंद्रीय गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती. तसेच, एम. के. अण्णा पाटील यांना २००१ ते २००४ या कालावधीत केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तब्बल २० वर्षांनी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांना मंत्रीपद मिळणार आहे.

    यातील लक्षणीय बाब म्हणजे आधी मंत्री झालेले सर्व मान्यवर हे गिरणा खोर्‍यातील होते. हे तिन्ही नेते चाळीसगावचे रहिवासी होते. तर तापी खोर्‍यातून रक्षाताई खडसे याच पहिल्यांदा केंद्रीय मत्रंपदी आरूढ होणार आहेत. याआधी कै. वाय. एस. महाजन, कै. डॉ. गुणवंतराव सरोदे आणि कै. हरीभाऊ जावळे यांची मंत्रीपदाची संधी हुकली. तथापि, रक्षाताई खडसे यांना मात्र केंद्रीय मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यातच, दोन दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपद मिळणार असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल व केळी साठी वरदान ठरेल असे नागरिक चर्चा रंगत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.