Header Ads

Header ADS

चिनावल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International-Yoga-Day-celebrated-with-enthusiasm-at-Chinawal


चिनावल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज चिनावल-तालुका रावेर येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  २१जून हा १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला योग शिक्षक  राकेशकुमार पाटील यांचे विद्यालयाचे उपप्राचार्य मीनल नेमाडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य एच.आर.ठाकरे सर, पर्यवेक्षक पी.एम.जावळे यांची उपस्थिती होती. योगशिक्षक राकेशकुमार पाटील यांनी योग प्रार्थना घेऊन उपस्थितांचा वॉर्म अप घेऊन वृक्षासन,ताडासन,वक्रासन, शवासन, वज्रासन,मकरासन, सर्वांगासन , चक्रासन ; त्रिकोणासन,नौकासन असे विविध प्रकारची आसने घेऊन प्राणायाम, लोम विलोम, भरसिका; ध्यान  यांचा सराव दिला. 

International-Yoga-Day-celebrated-with-enthusiasm-at-Chinawal


     जागतिक तापमानात होणारी  वाढ लक्षात घेऊन  प्रत्येक विद्यार्थ्याने झाडे लावून जगवण्याचा प्रण घेतला . सदर योग दिन हा प्राचार्य एच.आर.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.यासाठी एल.एम.ठाकूर,ए.व्ही. राणे,एम.एस.महाजन, जी.बी.चोपडे,एस.एस.नेहेते,एम.बी.पाटील,एन.एन.महाजन, एस.पी.नेमाडे,यांचे सहकार्य लाभले. सदर योगाभ्यासासाठी शेकडो विद्यार्थी ग्रामस्थांची उपस्थिती होती. .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.