Header Ads

Header ADS

सव्वा दोन लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त

Gutkha worth half-two lakhs seized by Food and Drug Administration


सव्वा दोन लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त 

लेवाजगत न्यूज जळगाव -शहरातील गुरुदेव नगरातील मयंक ऑटो गॅरेजजवळील गोडावूनवर अन्न व औषण प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी २४ जून रोजी रात्री ११.३० वाजता छापा टाकून सुमारे २ लाख १९ हजार ६५० रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, तंबाखू, गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ जून रोजी पहाटे २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

लेवाजगत


   पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती अशी की, जळगाव शहरातील गुरुदेव नगरातील एका मयंक ऑटो गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीर रित्या प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि गुटखा असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाला मिळाली. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी त्यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीसांच्या मदतीने सोमवारी २४ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला. दरम्यान गोडावूनमध्ये अवैधपणे प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला आणि तंबाखू आढळून आला. या ठिकाणी जवळपास २ लाख १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोडाऊन मालक अरुण पाटील रा. गुरुदेव नगर, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी २५ जून रोजी मध्यरात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.