Header Ads

Header ADS

सावदा येथे ख्वाजा नगर भागात वीज चोरी शोध मोहीम आठ ग्राहकांचे वीज मीटर जप्त

 

Electricity-theft-detection-campaign-eight-consumer-electricity-meters-seized-in-Khwaja-city-area-at-Sawada

सावदा येथे ख्वाजा नगर भागात वीज चोरी शोध मोहीम आठ ग्राहकांचे वीज मीटर जप्त

लेवाजगत प्रतिनिधी सावदा साजिद शेख-शहरातील ख्वाजा नगर भागामध्ये दिनांक १२ रोज बुधवार दिवशी अचानक  वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी कमी वीज बिल आलेल्या ग्राहकांचे वीजमीटर चेक करून जे ग्राहक  वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करताना आढळुन आले. अशा एकूण ७ ते ८ ग्राहकांवर वीजचोरी पथकाने कारवाई केली असून सदर ग्राहकांचे मीटर महावितरण कंपनी कडे जमा करण्यात आले आहे. 

Electricity-theft-detection-campaign-eight-consumer-electricity-meters-seized-in-Khwaja-city-area-at-Sawada


    या अचानक राबवलेल्या वीजचोरी मोहीम पथकामध्ये  महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सहाय्यक अभियंता श्री. हेमंत चौधरी,सहाय्यक अभियंता,श्री.मंगेश यादव,सहाय्यक अभियंता श्री. विशाल किनगे,सहाय्यक अभियंता श्री.योगेश चौधरी,प्रधान तंत्रज्ञ श्री.राजु कचरे ,वरिष्ठ तंत्रज्ञ भूषण बेंडाळे, गिरीश कापडे, प्रविण साळी,तंत्रज्ञ विशाल नेमाडे, तेजस जाधव सहभागी झाले होते यांनी तपासणी करून शेडछाड केलेल्या वीज मीटर ग्राहकांचे मीटर जप्त करून कार्यवाही केली.

     तरी महावितरणकडून सर्व सावदा शहरातील ग्राहकांना आवाहन करण्यात येते की वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी कोणीही वीजचोरी करू त्यामुळे वारंवार डिपि जळणे, तार तुटणे, फेज,डिओ जाणे. असे प्रकार घडतात. तरी वीज मीटर ग्राहकांनी वीज चोरी करू नये अन्यथा वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते तरी कारवाई टाळण्यासाठी नियमित स्वच्छ मनाने विजेचा वापर करावा असेही आवाहन अभियंत्यांनी यावेळी नागरिकांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.