Header Ads

Header ADS

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन लवकरच एकत्र येणार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य


 एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन लवकरच एकत्र येणार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य


लेवाजगत न्युज जळगाव:- लवकरच एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद मिटवण्याच्या प्रयत्नाला यश मिळणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केलं. संत गजानन महाराजांचे (Sant Gajanan Maharaj) दर्शन घेतल्यानंतर खडसे बोलत होत्या. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार घेतल्यानंतर मी मोठ्या ताकदीने काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे मार्गदर्शन मला लाभणार असल्याचेही खडसे म्हणाल्या. 

लेवाजगत


संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळाली

रक्षा खडसे या कुटुंबियांसह गजानन महाराजांच्या दर्शनाला आल्या होत्या. यावेळी सोबत एकनाथ खडसे देखील होते. सून मंत्री झाल्यामुळं आमचे श्रद्धास्थान असलेल्या संत गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मात्र, भाजपात प्रवेश कधी होणार? हा प्रश्न विचारल्यावर एकनाथ खडसे निरुत्तरित झाले. याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.