Header Ads

Header ADS

जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार शेती कर्ज भरण्यासाठी दिलेली रक्कम विकासोच्या सचिवाने केला अपहार शेतकरी कर्जा पासून वंचीत आ. शिरीष चौधरी यांनी तालुका दुय्यम निबंधकास सुनावले खडे बोल

District-bank-refuses-to-give-loan-to-farmers-amount-given-to-pay-off-agricultural-loan-by-development-secretary-frauded-farmers-deprived-of-loan-by-Shirish-Chaudhary-of-Taluka-Second-  The registrar-heard-stone- talk


जिल्हा  बँकेचे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार 

 शेती कर्ज भरण्यासाठी दिलेली रक्कम विकासोच्या सचिवाने केला अपहार शेतकरी कर्जा पासून वंचीत

आ. शिरीष चौधरी यांनी तालुका दुय्यम निबंधकास सुनावले खडे बोल 

लेवाजगत न्यूज सावदा- रोझोदा ता. रावेर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटी चा सचिवाने शेतकऱ्यांनी बँकेत कर्ज भरण्यासाठी दिलेले पैसे बँकेत न भरल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. शामराव महाजन असे या सचिवाचे नाव आहे.

District-bank-refuses-to-give-loan-to-farmers-amount-given-to-pay-off-agricultural-loan-by-development-secretary-frauded-farmers-deprived-of-loan-by-Shirish-Chaudhary-of-Taluka-Second-  The registrar-heard-stone- talk


     सावदा येथे जिल्हा उपनिबंधक गौतम बालसंणे  एका कार्यक्रमासाठी आले असता रोझोदा येथील शेतकऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली आहे .शेतकऱ्यांनी बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे बँकेत जमा न झाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नाहीये. यामुळे शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते. तर झालेल्या फसवणुकीमुळे  नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतीही तयार करू शकलो नसल्याचे या वेळी या शेतकऱ्यांनी सांगितले  आहे. यावेळी आमदार शिरीष दादा चौधरी ही चांगले संतप्त झाले होते दूरध्वनी वरून त्यांनी तालुका दुय्यम निबंधक गवळी यांना खडे बोल सुनावले आहेत.

३ लाख ५५ हजार २५० रुपये 

 अशी चार शेतकऱ्यांची रक्कम या सचिवाने बँकेत भरलेली नाही व तालुका दुय्यम निबंधक  यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही  कुठलाही न्याय मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक यांच्याकडेच आपली कैफियत मांडली.

 रोझोदा येथील  काही शेतकऱ्यांनी  विकासाचे सचिव शामराव महाजन यांच्याकडे पीक कर्ज नवे जुने करण्यासाठी डिसेंबर महिन्यात बँकेत भरणा करण्यासाठी कर्जाची रक्कम दिली होती नवीन कर्ज घेण्यासाठी बँकेत शेतकरी गेले असता तुमचं मागील कर्ज भरले गेले नसल्याने तुम्हाला नवीन कर्ज मिळू शकत नाही अशी माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पायाखालची मातीच सरकली आहे. यामुळे ज्या सचिवांवर विश्वास ठेवला त्यानेच घात केल्याचे समोर आले असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

 सदर सचिव हा गाते,कळमोदा,उधळी या ठिकाणी देखील कार्यरत होता.त्यामुळे या गावांना देखील या सचिवाने काय काळबेर केला आहे.याची चौकशीची मागणी तेथील शेतकरी करीत आहे.

जिल्हा  बँकेचा कर्ज देण्यास नकार 

 रोझोदा गावातील ज्या शेतकऱ्यांनी विकासोच्या ऐवजी सरळ जिल्हा बँकेत कर्ज भरणा केला आहे अशा शेतकऱ्यांनाही बँकेने कर्ज देण्यास मज्जाव केला आहे व आमच्या मार्फतच तुम्ही सरळ कर्ज घ्या असे सांगत आहे किंवा विकासोचे संपूर्ण दप्तर समोर आल्यानंतरच तुम्हाला आम्ही कर्ज देऊ असे सांगत आहे.

 भरत लिधुरे - पीडित शेतकरी रोझोदा


सदर सचिव हा एप्रिल महिन्यात निवृत्त झालेला आहे. त्याने नवीन सचिवांना पदभार, दप्तर दिलेले नाही. दप्तर ताब्यात घेण्यासाठी  कलम 80 खाली त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसे रावेर तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे तहसीलदार हे पोलिसांना आदेश करून दप्तर ताब्यात घेण्यात येईल तदनंतर ऑडिट करून सचिवाने काय घोळ केला आहे हे लक्षात येईल त्यानंतरच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल 

 गौतम बालसने 

 जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) जळगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.