Header Ads

Header ADS

बोरीवली येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय बँगचे वाटप

 

Distribution-of-free-school-bangs-to-students-at-Borivali

बोरीवली येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय बँगचे वाटप

 [ मुंबई - राजेंद्र चौधरी ] बोरीवली येथील प्रियदर्शिनी शिशु विकासिनी पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी विभागाच्या चौथीपर्यंतच्या पन्नास गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मुंबई व परिसर लेवा मंडळाच्या वतीने नुकतेच [ दि. २० जून ] गुरुवार रोजी मोफत शालेय बँगचे वाटप करण्यात आले.
       बोरीवली पश्चिम येथील एम. एच. बी. काँलनीतील प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक मंडळ मुंबई संचालित प्रियदर्शिनी शिशु विकासिनी पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी विभागाच्या चौथीपर्यंतच्या गरीब व गरजू अशा ५० विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डाँ. आशीर्वाद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेच्या खजिनदार प्रतिमा गरुड यांच्या सहकार्याने मुंबई व परिसर लेवा मंडळाचे सचीव निळकंठ त्र्यंबक चौधरी [ भालोद ], ललिता पाटील, उर्मिला धांडे तसेच अरुण चौधरी [ खिरोदा ] यांच्या हस्ते मोफत शालेय बँगचे वाटप करण्यात आले. यावेळी हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयाचे विभाग प्रमुख सुभाष शेलार यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. यावेळी नितिन किरंगे, जयश्री सावंत, समाधान पाटील, राजेंद्र चौधरी, अंजली पुजारी, सोनल अनावकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.