Header Ads

Header ADS

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग मूळ सावदा-रावेर येथूनच करा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मागणी:-केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

 

 बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग मूळ सावदा-रावेर येथूनच करा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मागणी:-केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

लेवाजगत न्युज सावदा:- बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच करणे बाबत आदेश पारित करावे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांना मागणी .

लेवाजगत



 महामार्ग बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण हे मुक्ताईनगर तालुक्यातून नकरता आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करणे, तसेच सदर रस्त्याचे सध्या चालू असलेले देखभाल दुरुस्ती तत्काळ सुरु करणे बाबत ठेकेदाराला आदेश करणे बाबत आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.


केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले असून जमीन संपादन बाबत नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते, सदर रस्ता पूर्वीच्या मार्गाने नकरता मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती, तसेच सदर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने रु.६१ कोटी निधी मंजूर असून ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम संथ गतीने होत आहे व सध्या तर काम बंद आहे.


अश्या नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन सदर महामार्ग पूर्वीच्या मार्गानेच करणे तसेच सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती असलेल्या ठेकेदारास काम तत्काळ सुरु करणे नाही तर कंत्राटदार बदलविणे बाबत श्री.नितीनजी गडकरी यांना मागणी केली. यावर त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.