Header Ads

Header ADS

दाऊद इब्राहिमचा साथीदार डोला सलीम विरोधात कारवाई, मुंबई पोलीस जारी करणार रेड कॉर्नर नोटीस


 दाऊद इब्राहिमचा साथीदार डोला सलीम विरोधात कारवाई, मुंबई पोलीस जारी करणार रेड कॉर्नर नोटीस


लेवाजगत न्युज मुंबई:-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा साथीदार डोला सलीम (Dola Salim) आणि त्याच्या मुलाविरोधात मुंबई पोलीस (Mumbai Police) लवकरच रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) जारी करणार आहेत. कारण हे दोघेही एका वर्षात 1000 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा व्यापार करतात. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक जवळच्या साथीदारांवर कारवाई केली आहे. आता डोला सलीम आणि त्याच्या मुलावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

 डोला सलीम कधी दुबईत तर कधी तुर्कीमध्ये 

दाऊदचा जवळचा सहकारी डोला सलीम आणि त्याचा मुलगा ताहिर डोला यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एक महत्त्वाचा व्यक्ती या ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. दाऊद इब्राहिमचा खास गुंड सलीम सध्या दुबईत बसून दाऊदचा ड्रग्ज व्यवहार पाहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  तो कधी दुबईत तर कधी तुर्कीमध्ये फिरत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. डोला सलीम लोकांना दाखवण्यासाठी रिअल इस्टेटचे काम करतो पण त्याचा खरा व्यवसाय ड्रग्जचा आहे.

पोलीस लवकरच करणार पिता-पुत्राच्या विरोधात रेड कॉर्नर दाखल करणार 

ड्रग्जच्या व्यवसायात डोला सलीमचा मुलगा ताहीर डोलाही त्याला मदत करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळेच गुन्हे शाखेने त्यालाही या प्रकरणात आरोपी केले आहे. आता पोलीस लवकरच या कामात असलेल्या पिता-पुत्राच्या विरोधात रेड कॉर्नर दाखल करणार आहेत. अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर नोटीस जारी केली जाणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, डोला सलीम हा दाऊदच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. तो त्याच्यासाठी भारतात ड्रग्जचा व्यापार पाहतो.

सांगली जिल्ह्यातील एका ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा, 245 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

महिला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा टाकला होता. तिथून पोलिसांनी 122.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 245 कोटी रुपये आहे. या कारखान्यात पोहोचण्यापूर्वी मुंबई गुन्हे शाखा सहा महिन्यांपासून एकामागून एक लिंक जोडत होती. 6 महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना सांगलीच्या कारखान्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर तेथील पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

एका प्रकरणात डोला सलीमला झाली होती अटक

या प्रकरणापूर्वी डोला सलीमला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने तत्कालीन आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सांताक्रूझ परिसरात टाकलेल्या छाप्यात अटक केली होती. 100 किलो फेंटॅनाइल ड्रग्ज जप्त केले होते. 1000 कोटी जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी डोला सलीमला रंगेहात अटक केली होती. त्यात डोलाला जामीन मिळाला आणि जामीन मिळताच तो नेपाळमार्गे पळून जाऊन लपण्यासाठी दुबईला गेला होता. आता त्याने तिथून दाऊदसाठी ड्रग्जचा धंदा सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.