Header Ads

Header ADS

भुयारी रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यात बुडाल्याने आसोद्याच्या शेतकऱ्याचा मृत्यू

भुयारी-रेल्वे-बोगद्यात-साचलेल्या-पाण्यात-बुडाल्याने-आसोद्याच्या-शेतकऱ्याचा-मृत्यू


भुयारी रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यात बुडाल्याने आसोद्याच्या शेतकऱ्याचा मृत्यू

लेवाजगत न्यूज जळगाव-मुसळधार पावसाने भुयारी रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सुकलाल लालचंद माळी (रा. आसोदा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळ शहरापासून पाच किलोमीटरवर आसोदा गावाजवळ आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा- मन्यारखेडा  दरम्यानच्या रस्त्यावर रेल्वे लाइन खालील भुयारी मार्गात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने १५ ते १८ फूट पाणी साचले. पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह शेतात जाणाऱ्या सुकलाल लालचंद माळी (रा. आसोदा) या ६५ वर्षीय शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊला उघडकीस आली. घटनेनंतर ग्रामस्थांनी रेल्वे रुळावर थांबून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अडीच ते चार वाजेच्या दरम्यान दीड तासात शहरात १९.५ मिमी तर आसोदा मंडळात २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भुयारी-रेल्वे-बोगद्यात-साचलेल्या-पाण्यात-बुडाल्याने-आसोद्याच्या-शेतकऱ्याचा-मृत्यू


     सुकलाल माळी यांचे आसोदा शिवारात रेल्वेमार्ग ओलांडून शेत आहे. ते सोमवारी पाऊस झाल्याने मंगळवारी सकाळी बैलगाडीने शेतात पेरणीसाठी जात होते. भुयारी मार्गातून जाताना पाणी साचलेले आढळले. तेव्हा बैलांच्या खांद्यापर्यंत पाणी आल्याने त्यांना सुकलाल मागे घेत होते. परंतु, एका बैलाने गाडी ओढत नेली. त्याही स्थितीत त्यांनी एका बैलाचा दोर कापला. त्याच वेळी दुसऱ्या बैलाने गाडी जोरात ओढून खोल पाण्यात नेली.परंतू सुकलाल माळी यांना पोहात येत नसल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यांना तपासून मयतघोषित केले. कुटुंबीयांनी प्रसंगी एकच आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यची नोंद करण्याचे काम सुरू होते.


भुयारी रेल्वे मार्गाला आसोदा ग्रामस्थांनी केला होता विरोध

   आसोदा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या आसोदा शिवारात शेतजमिनी आहेत. त्यासाठी आसोदा-मन्यारखेडा हा पारंपरिक रस्ता होता. या मार्गावर पूर्वी रेल्वे फाटक होते. ते काढून फाटकमुक्त अभियानात भुयारी मार्गासाठी जागा निवडण्यात आली. त्यासाठी या रस्त्यावरून जाणाऱ्या हायटेन्शन लाइनसाठी भुयारी रस्त्याला वळण देण्यात आले. त्यामुळे पाणी साचून नागरिकांचे हाल होतील म्हणून या ठिकाणी भुयारी मार्ग बनवू नये, असा लेखी विरोध केला होता. तसेच गेल्या वर्षीही एका शेतकऱ्याचा याच भुयारी मार्गात बुडून मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थ सचिन माळी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.