Header Ads

Header ADS

भोरगाव लेवा पंचायतीच्या प्रभारी कुटुंबनायकपदी ललित पाटील जळगाव, भुसावळ, मलकापूर येथील शाखा बरखास्तीचा निर्णय

 

Bhorgaon-Lewa-Panchayat-In-Charge-of-Family-Nayak-Lalit-Patil-Jalgaon-Bhusawal-Malkapur-Branch-Dismissal-Decision

भोरगाव लेवा पंचायतीच्या प्रभारी कुटुंबनायकपदी ललित पाटील जळगाव, भुसावळ, मलकापूर येथील शाखा बरखास्तीचा निर्णय

लेवाजगत न्यूज सावदा- भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे ता. यावल या पंचायतीची बैठक शुक्रवारी पाडळसे येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश विठु पाटील उपस्थित होते. पंचायतीच्या बैठकीत एकमताने ठराव करीत नवीन कार्यकारिणीची घोषणा झाली. त्यात सह कुटुंबनायक म्हणून ललीतकुमार रमेश पाटील यांची निवड झाली. कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या तब्बेतीच्या कारणामुळे सहकुटुंबनायक म्हणून त्यांचे चिरंजीव ललीतकुमार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या प्रस्तावात आमदार शिरीष चौधरी आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी अनुमोदन देवून ठराव मंजुर केला. यावेळी प्रभारी स्वरूपात नियुक्त केलेल्या जळगाव, भुसावळ आणि मलकापूर येथील विभागीय शाखेच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या. पंचायतीकडून लवकरच येथे नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केंद्रीयमंत्रीपद मिळाल्याने मंत्री रक्षा खडसेंच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी बी. के. चौधरी, विष्णू भंगाळे, मिलींद वाघूळदे, दिनेश भंगाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय राणे, एन.टी. पाटील, आरती चौधणी, डॉ. प्रियदर्शनी सरोदे उपस्थित होते.

Iti


अशी आहे नवीन कार्यकारिणी

कुटुंबनायकः रमेश विठू चौधरी, सह कुटुंबनायकः ललीतकुमार पाटील, कार्याध्यक्षः एकनाथ खडसे, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव : अॅड. संजय राणे, खजीनदार: बी. के. चौधरी, सदस्य : डॉ. ज्ञानेश्वर पाटील, विष्णू भंगाळे, एन.टी.पाटील, दिनेश भंगाळे, मिलींद वाघुळदे, आरती चौधरी, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, सुहास चौधरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.